माजी खासदार स्व. उत्तमराव ढिकले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पंचवटी भूषण पुरस्कारांचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 01:17 AM2018-02-11T01:17:30+5:302018-02-11T01:18:05+5:30
पंचवटी :पंचवटी सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने व्यक्तींना पंचवटी रत्न, पंचवटी भूषण व पंचवटी गौरव पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
पंचवटी : माजी खासदार स्व. उत्तमराव ढिकले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पंचवटी सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने शनिवारी (दि.१०) शैक्षणिक, सामाजिक, क्र ीडा व कलावंत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाºया व्यक्तींना पंचवटी रत्न, पंचवटी भूषण व पंचवटी गौरव पुरस्कारांनी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी, नगरसेवक गुरुमित बग्गा, मविप्रचे डॉ. सुनील ढिकले आदींसह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी के. के. मुखेडकर होते. १० फेब्रुवारी हा दिवस स्व. उत्तमराव ढिकले यांचा जन्मदिवस असून, गेल्या अनेक वर्षांपासून ढिकले यांच्या जन्मदिनाच्या औचित्यावर पंचवटी भूषण व पंचवटी गौरव पुरस्काराचे वितरण केले जाते. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाºया व्यक्तींना यावेळी कुलकर्णी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. ढिकले हे चतुरस्त्र असे व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी समाजासाठी सुरू केलेले कार्य स्मरणात राहणारे आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमाला नगरसेवक सलीम शेख, अनिल मटाले, सुनील खुने, स्वामी माधवप्रकाश, अस्मिता पटेल, शेखर ढिकले, नथू देवरे, माधव भणगे, धनंजय धनवटे, बाळासाहेब जानोरकर, सुरेश ढिकले, सचिन ढिकले, सुभाष पाटील, दिलीप खेडकर, उल्हास धनवटे, मंदार जानोरकर, मंगेश जानोरकर आदी उपस्थित होते.