नामकोचे माजी चेअरमन भवरीलाल मोदी यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 01:14 AM2021-02-12T01:14:56+5:302021-02-12T01:15:25+5:30
सहकारी बँकिंग क्षेत्रावर प्रभुत्व असलेले नामको बँकेचे माजी चेअरमन भवरीलाल जवरीलाल मोदी (७६) यांचे गुरुवारी रात्री ९.३० वाजता हृदयविकाराने निधन झाले.
नाशिक : सहकारी बँकिंग क्षेत्रावर प्रभुत्व असलेले नामको बँकेचे माजी चेअरमन भवरीलाल जवरीलाल मोदी (७६) यांचे गुरुवारी रात्री ९.३० वाजता हृदयविकाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा शुक्रवारी (दि.१२) सकाळी १०.३० वाजता एन.डी. पटेल रोडवरील त्यांच्या निवासस्थानापासून निघणार आहे.
भवरीलाल मोदी यांनी नाशिक जिल्ह्यासह राज्यातील सहकारी बँकिंग क्षेत्रामध्ये एक काळ गाजविला होता. त्यांनी नामको बँकेचे चेअरमनपद भूषविले होते. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे माजी संचालक, नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, राज्य सहकारी बँक फेडरेशनचे संस्थापक उपाध्यक्ष, रिझर्व्ह बँकेच्या सहकारी बँक समितीचे सदस्य, अशी विविध पदे त्यांनी भूषविली होती.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन भाऊ, मुलगा, सून, दोन मुली व नातवंडे, असा परिवार आहे. जैन कॉन्फरन्सचे राज्य अध्यक्ष ललित मोदी, सुप्रसिद्ध सनदी लेखापाल अशोक मोदी व व्यावसायिक ज्योतीकुमार मोदी यांचे ते बंधू होत.