देवळाली छावणी परिषदेच्या माजी अध्यक्षाच्या पुत्रावर झाडली गोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 12:13 AM2020-05-10T00:13:58+5:302020-05-10T00:20:06+5:30

कोणीही कलम१४४नुसार जमावबंदी, संचारबंदी कायद्याचे उल्लंघन करू नये, अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा यावेळी पोलिसांनी दिला. जखमी बिट्टू याची प्रकृती स्थिर

Former president of Deolali cantonment council shot dead | देवळाली छावणी परिषदेच्या माजी अध्यक्षाच्या पुत्रावर झाडली गोळी

देवळाली छावणी परिषदेच्या माजी अध्यक्षाच्या पुत्रावर झाडली गोळी

Next
ठळक मुद्देनागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नयेहल्लेखोरांची ओळख पटली आहे

नाशिक : देवळाली कॅम्प छावणी परिषदेचे माजी अध्यक्ष व रिपाइंचे पदाधिकारी विलास पवार यांचे पुत्र यश पवार उर्फ बिट्टू या युवकारवर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या अज्ञात इसमांनी देवळाली कॅम्प भागातील हाडोळा परिसरात गोळीबार केल्याची घटना रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. जखमी बिट्टू यास खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती समजताच नाशिकरोड, देवळाली कॅम्प, उपनगर पोलिस ठाण्यांचा फौजफाटा घटनास्थळी पोहचला.

देवळाली कॅम्प परिसरातील हाडोळा भागात रात्रीच्या सुमारास बिट्टू वावरत असताना त्याच्यावर अचानकपणे हल्लेखोरांने गावठी पिस्तूलमधून गोळी झाडली. गोळी बिट्टूच्या मांडीत घुसली. गोळीबाराचा आवाज ऐकून परिसरातील लोकदेखील बाहेर आले. यावेळी रक्ताच्या थारोळ्यात बिट्टू पडलेला होता. घटनेची माहिती तत्काळ देवळाली कॅम्प पोलिसांना नागरिकांनी दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी त्वरित पोहचले. त्यांनी नागरिकांच्या मदतीने जखमी बिट्टू यास नाशिकरोड येथील एका रुग्णालयात दाखल केले. यावेळी नाशिकरोड भागात मोठी गर्दी जमली होती. तसेच या गोळीबाराच्या घटनेचे कुठलेही पडसाद लॉकडाउन काळात उमटू नये, यासाठी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी तत्काळ सर्व वरिष्ठ अधिकारी व उपनगर, नाशिकरोड, इंदिरानगर या पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक गस्तीपथके यांना तत्काळ नाशिकरोड, देवळाली कॅम्प परिसरात दाखल होत बंदोबस्तात वाढ करून गर्दीला पांगविण्याचे आदेश दिले. पोलिसांचा मोठा फौजफाटा नाशिकरोड भागात दाखल झाल्यानंतर रुग्णालयाच्या आवाराबाहेर जमलेली गर्दी पांगण्यास सुरूवात झाली. यावेळी पोलिसांनी उद्घोषणा करत जमावाला शांत राहण्याचे आवाहन करत आपआपल्या घरी जाण्यास सांगितले. हल्लेखोरांची ओळख पटली असून त्यांना लवकरच अटक केली जाईल, असे आश्वासन उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दिले. कोणीही कलम१४४नुसार जमावबंदी, संचारबंदी कायद्याचे उल्लंघन करू नये, अन्यथा संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा यावेळी पोलिसांनी दिला. जखमी बिट्टू याची प्रकृती स्थिर असून नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व अफवा पसरवू नये, असे आवाहन पोलीस आुयक्त विश्वास नांगरे पाटील यांनी केले आहे.

Web Title: Former president of Deolali cantonment council shot dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.