महाराष्ट्र चेंबरचे माजी अध्यक्ष दिग्विजय कापडिया यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:11 AM2021-07-05T04:11:19+5:302021-07-05T04:11:19+5:30

नाशिक : प्रख्यात कापड व्यापारी तथा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष दिग्विजय कापडिया (७६) यांचे अल्पशा आजाराने ...

Former President of Maharashtra Chamber Digvijay Kapadia passes away | महाराष्ट्र चेंबरचे माजी अध्यक्ष दिग्विजय कापडिया यांचे निधन

महाराष्ट्र चेंबरचे माजी अध्यक्ष दिग्विजय कापडिया यांचे निधन

Next

नाशिक : प्रख्यात कापड व्यापारी तथा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष दिग्विजय कापडिया (७६) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना रविवारी (दि. ४) पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, नातवंडे, असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सकाळी नाशिक अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मेन रोडवरील बाबूभाई क्लॉथ स्टोअर्स येथून व्यवसायाची सुरुवात करणाऱ्या दिग्विजय कापडिया यांनी रिअल इस्टेट, रिटेल ॲण्ड होलसेल क्लॉथ मर्चंट, गव्हर्नमेंट सप्लायर्स म्हणून व्यवसायात लौकिक कमावला. त्यासोबतच पंचवटी एज्युकेशन सोसायटी, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रीकल्चर, नाशिक रिटेल क्लॉथ मर्चंट असोसिएशन, ऑल इंडिया रिटेल क्लॉथ फेडरेशन, नवी दिल्ली, कच्छी लोहाणा समाज, जेसी, लायन्स क्लब, रोटरीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. त्याचप्रमाणे आयकर सल्लागार समिती, विक्रीकर सल्लागार समिती, विभागीय रेल्वे सल्लागार समिती, क्षेत्रीय रेल्वे सल्लागार समिती यासारख्या विविध समित्यांचेही ते सदस्य होते.

ऑल इंडिया क्लॉथ मर्चंट फेडरेशनच्या अध्यक्षपदावरून व्यावसायिकांच्या हक्कासाठी सुमारे तीस ते चाळीस वर्षांपासून त्यांनी लढा दिला होता. २०१० साली त्यांनी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. तत्पूर्वी महाराष्ट्र चेंबरच्या उपाध्यक्षपदावर त्यांनी नाशिकला कृषी प्रदर्शनाच्या आयोजनाचा शुभारंभ केला होता. पंचवटी येथील आर.पी. विद्यालयाच्या अध्यक्षपदावरूनही त्यांनी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले. जकातविरोधी आंदोलनांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला होता. त्यांच्या अभ्यासू व्यक्तिमत्त्वामुळे अनेक क्षेत्रांत प्रशिक्षण देण्यामध्ये ते नेहमी अग्रेसर राहत होते. उत्साही, जनसंपर्क वाढविण्यावर विशेष भर ठेवणारे असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या निधनाने नाशिकच्या व्यापार क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, पालकमंत्री छगन भूजबळ यांच्यासह महाष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, नाशिक शहर सिमेंट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शोक व्यक्त केला आहे.

040721\04nsk_8_04072021_13.jpg

दिग्विजय कापडिया

Web Title: Former President of Maharashtra Chamber Digvijay Kapadia passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.