माजी पंतप्रधान वाजपेयी यांच्या अस्थींचे नाशिकमध्ये रामकुंडात विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 06:45 PM2018-08-24T18:45:15+5:302018-08-24T20:23:51+5:30
नाशिक - देशाचे माजी पंतप्रधान आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या अस्थिकलशाची शोभा यात्रा काढून सकाळी विधीवत अस्थि विसर्जन करण्यात आले. पालकमंत्री गिरीश महाजन आणि तसेच राज्याचे दुग्धविकास पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते झालेल्या विर्सजनाच्या वेळी भाजपातील लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
नाशिक- देशाचे माजी पंतप्रधान आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या अस्थिकलशाची शोभा यात्रा काढून सकाळी विधीवत अस्थि विसर्जन करण्यात आले. पालकमंत्री गिरीश महाजन आणि तसेच राज्याचे दुग्धविकास पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते झालेल्या विर्सजनाच्या वेळी भाजपातील लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
वाजपेयी यांचे अस्थिकलश बुधवारी (दि.२२) मुंबईत आणल्यानंतर नाशिकच्या महापौर रंजना भानसी यांनी तो भाजपाच्या स्थानिक मुख्यालयात आणला होता. त्यानंतर गुरूवारी दिवसभर सर्व पक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांनी अस्थिकलशाचे दर्शन घेण्यासाठी रीघ लावली होती. शुक्रवारी सकाळी वसंत स्मृती येथून सजवलेल्या रथावरून अस्थिकलश रामकुंडावर नेण्यात आला. वसंतस्मृती, शालिमार, शिवाजीरोड, संत गाडगे महाराज चौक, मेनरोड, रविवार कारंजा, मालेगाव स्टँड, पंचवटी कारंजावरून रामकुंड असा रथ आणण्यात आला तेव्हा पक्षाचे अनेक नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. भजनी मंडळांचाही त्यात सहभाग होता. रामकुंडावर अस्थिकलश आल्यानंतर अस्थींचे मंत्रोच्चारात पूजन करण्यात आले त्यानंतर पालकमंत्री महाजन, जानकर, आमदार बाळासाहेब सानप यांच्या हस्ते अस्थींचे विसर्जन करण्यात आले. सतीश शुक्ल व त्यांच्या सहकाऱ्यांनी विधी करून घेतले.
यावेळी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, महापौर रंजना भानसी,माणिकराव कोकाटे,उपमहापौर प्रथमेश गीते, स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके, माजी खासदार प्रतापदादा सोनवणे, सुनील बागुल, माजी महापौर अशोक मुर्तडक, महंत भक्तीचरणदास, सोमेश्वरानंद, लक्ष्मण सावजी, माजी आमदार निशिगंधा मोगल, दिनकर पाटील,नगरसेवक गणेश गीते, जगदीश पाटील, प्रियंका माने, रु ची कुंभारकर आदींसह भाजपाचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.