माजी सभापती विरुद्ध विद्यमान सभापती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 10:41 PM2020-04-29T22:41:24+5:302020-04-29T23:29:55+5:30
नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे यांच्याकडून बाजार समितीच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना दमदाटी व शिवीगाळ करून दहशत निर्माण केली जात असल्याची तक्रार बाजार समितीचे सभापती संपतराव सकाळे यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे. अशी तक्रार करताना सकाळे यांनी बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीची प्रतही जोडली आहे.

या संदर्भात दिलेल्या तक्रारीत सकाळे यांनी म्हटले आहे की, शिवाजी चुंभळे यांचे बाजार समिती सभापतिपद गेल्यामुळे ते वैफल्यग्रस्त झाले असून, बाजार समितीच्या कामकाजाविषयी चुकीचा गैरसमज निर्माण करीत आहेत. बाजार समितीतील अधिकारी व कर्मचाºयांशी फोनवरून संपर्क साधून त्यांची जिल्हा उपनिबंधक, लाचलुचपत प्रतिबंधक खात्यामार्फत चौकशी करण्याची धमकी देत आहेत. यापूर्वीही बाजार समितीच्या संचालकांनी चुंभळे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रारी दिल्या असून, तसे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. चुंभळे यांच्याविरोधात शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करण्याबाबत तसेच कर्मचाºयांना दमदाटी केल्याबाबत गुन्हा दाखल करावा, अशी विनंतीही बाजार समितीचे सभापती संपतराव सकाळे यांनी केली आहे.
या संदर्भात सकाळे यांना बाजार समितीच्या सुमारे तेरा कर्मचारी, अधिकाºयांनी शिवाजी चुंभळे यांच्या विरोधात दिलेल्या निवेदनाची प्रतही जोडली आहे. त्यात या कर्मचाºयांनी आपल्या जीविताचे काही बरे-वाईट झाल्यास शिवाजी चुंभळे यांना जबाबदार धरण्यात यावे, अशी मागणी केली आहे.