पेठे विद्यालयाचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 12:50 AM2019-05-23T00:50:22+5:302019-05-23T00:50:38+5:30

पेठे विद्यालयात १९८४ मधील बॅचचा अभिनव स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्यासाठी १५०हून अधिक माजी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. विश्वास ठाकूर यांच्या संकल्पनेतून हा मेळावा नुकताच संपन्न झाला.

 A former student of the school of pathe | पेठे विद्यालयाचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा

पेठे विद्यालयाचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा

Next

नाशिक : पेठे विद्यालयात १९८४ मधील बॅचचा अभिनव स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्यासाठी १५०हून अधिक माजी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. विश्वास ठाकूर यांच्या संकल्पनेतून हा मेळावा नुकताच संपन्न झाला.
यावेळी ठाकूर म्हणाले की, जुन्या मित्रांशी बोलणे, त्यांना भेटणे, सुख-दु:ख शेअर करणे म्हणजे जीवनात खूप काही मिळाल्याची जाणीव असते. पन्नाशीनंतर मित्रांना पुन्हा नव्याने जोडणे म्हणचे भूतकाळाशी मैत्री करणे होय. यावेळी माजी विद्यार्थ्यांच्या क्रि केट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
डॉ. सुधीर संकलेचा व डॉ. मनोज शिंपी यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्र मास डॉ. आशुतोष रारावीकर, एअर इंडियाचे अधीक्षक इंजिनियर पराग कळवणकर, एबीबीचे उपाध्यक्ष अजय गोसावी, स्थापत्य अभियंता चंद्रशेखर रानडे, महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे अधिकारी अनंत अग्निहोत्री, आयकर अधीक्षक दिलीप देशमुख, उद्योजक मंगेश गणोरे, ऋषभ इंडस्ट्रीजचे महाप्रबंधक मनोज नायगावकर, प्रा. अनिल भंडारे, बीएसएनएलचे अधिकारी सतीश ठाकूर आदी उपस्थित होते.
आठवणींना मिळाला उजाळा
मेळाव्यात त्या काळातील गाणी अभिनय यांचा अनोखा मिलाफ मित्रांनी अनुभवला. यावेळी काही माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. त्यात अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. सुनील सोनार, दिलीप वाघ, बी.एस.एन.एल.चे महाप्रबंधक नितीन महाजन, संतोष कुलकर्णी, शरद निभोंरकर, मोहन उपासनी, मिलिंद एकतारे आदींनी शाळेविषयीच्या आठवणी सांगितल्या.

Web Title:  A former student of the school of pathe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.