गणेश चौक शाळेतील माजी विद्यार्थी मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 12:52 AM2018-12-01T00:52:03+5:302018-12-01T00:52:19+5:30

महापालिकेच्या गणेश चौक येथील शाळेतील १९९०च्या बॅचच्या माजी विद्यार्थी मेळावा नुकताच संपन्न झाला. मनपाच्या शाळेत शिक्षण घेतल्यानंतर शाळेच्या काळातील विद्यार्थी एकत्र आल्यानंतर यात कोणी डॉक्टर, इंजिनिअर होण्याबरोबरच सरकारी नोकरीत कायम झाले आहेत.

 Former students' rally in Ganesh Chowk School | गणेश चौक शाळेतील माजी विद्यार्थी मेळावा

गणेश चौक शाळेतील माजी विद्यार्थी मेळावा

Next

सिडको : महापालिकेच्या गणेश चौक येथील शाळेतील १९९०च्या बॅचच्या माजी विद्यार्थी मेळावा नुकताच संपन्न झाला.
मनपाच्या शाळेत शिक्षण घेतल्यानंतर शाळेच्या काळातील विद्यार्थी एकत्र आल्यानंतर यात कोणी डॉक्टर, इंजिनिअर होण्याबरोबरच सरकारी नोकरीत कायम झाले आहेत. तसेच काही राजकीय, सामाजिक क्षेत्रातही काम करणाऱ्यांची संख्या यावेळी दिसून आली. मेळाव्यात शाळेच्या काळात घडलेल्या गमती-जमतीच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.  पूर्वी मात्र मनपाच्याच शाळांची संख्या अधिक असल्याने बहुतांशी विद्यार्थी हे मनपाच्या शाळेतच शिक्षण घेत होते. महापालिकेच्या गणेश चौक शाळेत गेल्या १९९० साली शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा नुकताच संपन्न झाला. यावेळी या मेळाव्यात मनपाच्या मराठी शाळेत शिक्षण घेतल्यानंतरही आज माजी विद्यार्थींमध्ये डॉक्टर, इंजिनिअर, तसेच काही विद्यार्थी सरकारी नोकरीत उच्च पदावर असल्याचे तर काहींनी राजकारणात आपला वेगळा ठसा उमटविल्याचे दिसून आले. याबरोबरच काही माजी विद्यार्थी हे सामाजिक कामात पुढाकार घेऊन समाज घडविण्याचे काम करीत आहे. एरवी व्हॉट््सअ‍ॅप गु्रपच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधणाºया माजी विद्यार्थ्यांचा एकत्र मेळावा करण्यात यावा व जुन्या आठवणींना उजाळा द्यावा यासाठी संजय गुळवे या विद्यार्थ्याने पुढाकार घेतला. यानंतर बहुतांशी माजी विद्यार्थ्यांचा एकत्र मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापकांसह शाळेच्या शिक्षकांनी शिक्षण देण्याबरोबरच चांगले संस्कार दिल्यानेच आज सक्षम झाल्याची भावना विद्यार्थ्यांनी बोलून दाखविली. या मेळाव्यात सलिम मनियार, शैलेश कचरे, शरद मोगरे, नागेश काटकर, संतोष सोनपसारे, नरेंद्र दंडगव्हाळ, अशोक दोंदे, सदानंद झनकर, रवि यादव, गजानन सोनवणे, जितेंद्र हेडा, सुनील पवार, दादा पाटील, अजय शिरसाठ आदींसह माजी विद्यार्थी सहभागी झाले होते.
शालेय शिक्षण एकत्रित झाल्यानंतर दहावीनंतर अनेकजण वेगवेगळ्या महाविद्यालयात शिक्षण घेऊन डॉक्टर, इंजिनिअर, सरकारी नोकरीत, तर काहींनी राजकारण व समाजकारणात आपला ठसा उमटविला आहे. १९९० नंतर फक्त व्हॉट््सअ‍ॅपच्या माध्यमातून गप्पा केल्या जात होत्या. एकदा शाळेच्या दिवसाची पुन्हा आठवण व्हावी व माजी विद्यार्थ्यांनी एकत्र यावेत यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यातून एकमेकांमध्ये अजून आपुलकी वाढली. -संजय गुळवे,  समन्वयक, माजी विद्यार्थी

Web Title:  Former students' rally in Ganesh Chowk School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.