जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मोतीराम सुर्यवंशी यांचे निधन

By admin | Published: May 18, 2017 12:34 AM2017-05-18T00:34:10+5:302017-05-18T00:34:29+5:30

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षमोतीराम सुर्यवंशी यांचे निधन

Former Zilla Parishad chairman Motiram Suryavanshi dies | जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मोतीराम सुर्यवंशी यांचे निधन

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मोतीराम सुर्यवंशी यांचे निधन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सटाणा : नाशिक जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मोतीराम दोधा सूर्यवंशी ऊर्फ मोतीआण्णा (७९) यांचे आज सायंकाळी ५ वाजता निधन झाले. त्यांचे पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. सूर्यवंशी हे सन १९८२ मध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत निवडून आल्या नंतर त्यांना बागलाणचे पहिले अध्यक्ष होण्याची संधी मिळाली होती. माजी आमदार पंडित धर्माजी पाटील व माजी मंत्री डॉ. दौलतराव अहेर यांचे ते निकटवर्तीय मानले जात. त्यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा दोनदा मान मिळाला होता. आपल्या कारकीर्दीत मार्गी लावलेल्या विकासकामांमुळे त्यांना जिल्ह्यात नाव-लौकीक प्राप्त झाला होता.
उद्या (दि. १८) त्यांच्यावर ताहाराबाद रोडवरील वैकुंठधाम येथे सकाळी १० वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त अभिमन्यू सुर्यवंशी यांचे बंधू व शासकीय बांधकाम ठेकेदार प्रकाश व ललित सूर्यवंशी यांचे ते वडील होत.

Web Title: Former Zilla Parishad chairman Motiram Suryavanshi dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.