गडावर भाविकांचा ओघ कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 02:26 PM2019-04-19T14:26:20+5:302019-04-19T14:26:28+5:30
वणी : चैत्र यात्रोत्सवाच्या सांगतेनंतरही सप्तशृंगगडावर भाविकांच्या गर्दीचा ओघ कायम आहे. शुक्र वारी सुमारे दोन लाख भाविक भगवतीच्या चरणी नतमस्तक झाले.
वणी : चैत्र यात्रोत्सवाच्या सांगतेनंतरही सप्तशृंगगडावर भाविकांच्या गर्दीचा ओघ कायम आहे. शुक्र वारी सुमारे दोन लाख भाविक भगवतीच्या चरणी नतमस्तक झाले. गडावर रामनवमी ते हनुमान जयंती या कालावधीत चैत्र यात्रोत्सवाचे आयोजन प्रति वर्षा प्रमाणे करण्यात आले होते. उत्सव कालावधीत दर्शनार्थी नवस फेडणारे भाविक यांनी मोठ्या प्रमाणावर गडावर हजेरी लावली. सुमारे सात लाखाच्या जवळपास भाविक सप्तशृंगीदेवीच्या चरणी लीन झाले. प्रतीदिनी विविध महापुजेच्या आयोजनामुळे व भगवतीच्या केलेल्या सजावटीमुळे त्यात वस्त्रालंकारापासुन ते सुवर्ण लंकारापर्यंत तसेच फुलांच्या सजावटीमुळे भगवतीचे आकर्षक मुखकमलाचे रु प डोळ्यात साठविण्यासाठी मनोभावे दर्शन घेणारे भाविक ही भक्तीभावाची अनुभुती असताना शुक्र वारी सुमारे दोन लाख भाविक गडावर दाखल झाले होते. सकाळपासुन गडाच्या पहिल्या पायरीपासुन दर्शनासाठी बाऱ्या लागल्या होत्या.दोन दिवसांपेक्षा शुक्रवारच्या तापमानात काहीसा बदल जाणवत होता. उष्णतामानाचे प्रमाण काहीसे कमी जाणवत होते हवेत किंचीतसा गारवा जाणवत होता. हिच बाब भाविकांच्या दृष्टीकोणातुन दिलासा देणारी होती. महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी भाविकांची रीघ लागलेली होती. सर्वसाधारणपणे कीर्ती ध्वज गडावर उभारल्यानंतरदर्शन घेतल्यानंतर यात्रोत्सवाची सांगता होते व परतीच्या मार्गाला भाविक लागतात. त्यामुळे गडावरील गर्दी कमी होते असा काहीसा अनुभव आहे. मात्र या खेपेस भाविकांंच्या संख्येत झालेली वाढ व उत्सव सांगतेनंतर भाविकांची हजेरी ही व्यावसायिक बांधवांचा उत्साह वाढविणारी आहे. यात्रोत्सवानिमित्ताने मोठी आर्थिक उलाढाल गडावर झाली आहे.