पंचवटी कारंजा येथिल किल्ल्याची जिनियस बुकात नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:29 AM2021-02-21T04:29:00+5:302021-02-21T04:29:00+5:30
पंचवटी शिवजन्मोत्सव समितीतर्फे मिरवणूक पारंपरिक कार्यक्रमांना फाटा देत विश्वविक्रमी कार्य करण्याचा निर्धार केला होता. पंचवटी कारंजा छत्रपती ...
पंचवटी शिवजन्मोत्सव समितीतर्फे मिरवणूक पारंपरिक कार्यक्रमांना फाटा देत विश्वविक्रमी कार्य करण्याचा निर्धार केला होता. पंचवटी कारंजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ किल्ल्याची प्रतिकृती उभारणीचे नियोजन करण्यात आले होते.
त्यानंतर तीन आठवड्यात लाकूड, फायबर, व स्टीलचा वापर करून ६५ फूट उंच १५ फूट लांब आणि ४० फूट रुंद किल्ला उभारला. किल्ल्यावर चढण्यासाठी लाकडी पायऱ्यांची सोय करण्यात आली होती. किल्ल्याचा आतील सांगाडा लाकूड स्टीलचा व बाह्य आवरण फायबरचे होते. किल्ल्यावर जाऊन शिवप्रेमींनी शहरात दुर्गसफरीची अनुभूती घेतली. शिल्पकार आनंद सोनवणे, विवेक सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर किल्ला उभारला होता. जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, माजी खासदार देवीदास पिंगळे, नगरसेवक गुरमित बग्गा यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष मामासाहेब राजवाडे, उपाध्यक्ष दिगंबर मोगरे, सतनाम राजपूत, कार्याध्यक्ष उल्हास धनवटे, यांना विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र देण्यात आले. ( फोटो २० पंचवटी २)