दैव बलवत्तर म्हणून...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 02:14 PM2018-09-25T14:14:14+5:302018-09-25T14:14:34+5:30

 As fortunate | दैव बलवत्तर म्हणून...

दैव बलवत्तर म्हणून...

Next

मनमाड (गिरीश जोशी) : मनमाड रेल्वे स्थानकावर रेल्वे क्र ॉसिंग करण्याच्या प्रयत्नात असताना समोरून भरधाव वेगात आलेल्या गीतांजली एक्सप्रेसमुळे भेदरलेल्या भालुर येथील वृद्ध महिलेला रेसुब कर्मचा-यांच्या सतर्कतेमुळे जीवदान मिळाले आहे.दैव बलवत्तर म्हणून कर्मचाºयांच्या रु पात प्रत्यक्ष देवदूतच भेटल्याची भावना या महिलेने व्यक्त केली. भालूर ता: नांदगाव येथील सुमनबाई गंगाधर धनगे ही वृद्ध महिला निजामुद्दीन गोवा एक्सप्रेसने जळगाव येथून मनमाड रेल्वे स्थानकावर फलाट क्र मांक चारवर उतरली. फलाट क्र मांक तीन वरून फलाट क्र मांक दोन वर जाण्यासाठी रेल्वे लाईनवर उतरली.रेल्वे लाईनवर उतरताना तिच्या जवळील ओझे देण्यासाठी प्रवाशाने मदत केली.रेल्वे लाईन क्र ॉस करण्याच्या प्रयत्नात असताना फलाट क्र मांक दोन वर मुंबई कडून भुसावळ कडे जाणारी गीतांजली एक्सप्रेस भरधाव वेगात आली. या गाडीला मनमाड येथे थांबा नसल्याने ही गाडी वेगाने स्टेशन पार करत होती.या गाडीचा अंदाज न आल्याने वृद्ध महिला लाईन ओलांडण्याच्या प्रयत्नात असल्याची बाब फलाट क्र मांक तीन वर असलेले रेसुब कर्मचारी संतोष जायभाय यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता लाईनवर उतरून या वृद्ध महिलेला लाईन ओलांडण्यापासून थांबून वाचवले. साक्षात मृत्यूसमोर आलेला असताना रेसुब कर्मचा-यांनी देवदूत बनून महिलेला वाचवले. अगदी जवळून धडधडत गेलेल्या गाडीमुळे महिला खूपच भेदरली होती.या महिलेला रेसुब कार्यालयात आणून रेसुब निरीक्षक के डी मोरे व कर्मचाºयांनी धीर दिला.रेसुब कर्मचाºयांच्या सतर्कतेमूळे वृद्ध महिलेला जीवदान मिळाले आहे. 

Web Title:  As fortunate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक