तीन दिवसात चाळीस रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 10:19 PM2020-08-20T22:19:00+5:302020-08-21T00:34:05+5:30
बागलाण तालुक्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या तीनच दिवसात चाळीस कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, पैकी दोन जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. आता कोरोनाबाधितांचा आकडा तीनशे पार झाला असून, सटाणा शहर मात्र हॉटस्पॉट कायम आहे.
सटाणा : बागलाण तालुक्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या तीनच दिवसात चाळीस कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, पैकी दोन जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. आता कोरोनाबाधितांचा आकडा तीनशे पार झाला असून, सटाणा शहर मात्र हॉटस्पॉट कायम आहे.
बागलाण तालुक्यातील एकट्या सटाणा शहरात गेल्या महिनाभरापासून कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत सव्वाशेच्यावर कोरोनाबाधितांचा आकडा पोहोचला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आता जुन्या शहरातून नवीन वसाहतीकडे झाला आहे. गुरुवारपासून (दि. २०) गेल्या तीन दिवसात सटाणा शहरासह तालुक्यात तब्बल चाळीस कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. वैद्यकीय सूत्रांना प्राप्त झालेल्या अहवालात एकट्या सटाणा शहरात तब्बल १८ बाधित आढळले आहेत.