मिशन झिरो अंतर्गत चाळीस हजार चाचण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 01:09 AM2020-08-24T01:09:46+5:302020-08-24T01:11:14+5:30
शहरात कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात आणण्यसाठी राबविण्यात येत असलेल्या मिशन झिरो नाशिक अंतर्गत आत्तापर्यंत चाळीस हजार चाचण्या घेण्यात आल्या असून त्यात पाच हजारावरून अधिक बाधीतांना हुडकून काढण्यात यश आले आहे. दरम्यान, गेल्या चोवीस तासात शहरात तीन जणांचा मृत्यू झाला असून एकूण ३६२ रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे शहरात एप्रिलपासून आॅगस्ट पर्यंत बाधितांच्या संख्येने वीस हजारांचा टप्पा पार केला आहे.
नाशिक : शहरात कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात आणण्यसाठी राबविण्यात येत असलेल्या मिशन झिरो नाशिक अंतर्गत आत्तापर्यंत चाळीस हजार चाचण्या घेण्यात आल्या असून त्यात पाच हजारावरून अधिक बाधीतांना हुडकून काढण्यात यश आले आहे. दरम्यान, गेल्या चोवीस तासात शहरात तीन जणांचा मृत्यू झाला असून एकूण ३६२ रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे शहरात एप्रिलपासून आॅगस्ट पर्यंत बाधितांच्या संख्येने वीस हजारांचा टप्पा पार केला आहे.
शहरात कोरोना बाधीतांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत. गेल्या चोविस तासात ३६२ नवे बाधीत आढळले आहेत. त्यामुळे आत्तापर्यंतच्या एकुण बाधीतांची संख्या २० हजार ७४ झाली आहेत. त्यापैकी १६ हजार ८९३ रूग्ण बरे झालेले आहेत. त्याच बरोबर रविवारी (दि.२३) तीन जणांचा मृत्यू झाल. यात पंचवटीतील हिरावाडी येथील ७५ वर्षीय वृध्द महिला, सिडकोतील हनुमान चौकातील ५९ वर्षीय महिला आणि चौथ्या योजनेतील ५९ वर्षीय पुरूष रूग्णाचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. एप्रिल महिन्यापासून आत्तापर्यंत ४२९ जणांचा मृत्यू झाला आहे.
रविवारी (दि.२३) एका दिवसात १३२३ नागरीकांच्या अॅटीजेन चाचण्या करण्यात आल्या. त्यात २३२ नवे कोरोना बाधीत आढळले आहेत. या मोहिमेत वीस फिरते दवाखाने आणि २२५ आरोग्य कर्मचारी आढळले आहेत.
मिशन अंतर्गत नाशिक महापालिका आणि भारतीय जैन संघटनेच्या वतीने शहरात गेल्या २९ दिवसांपासून मिशन झिरो नाशिक राबविण्यात येत आहे. त्या अतंर्गत कोरोना चाचण्यांचा चाळीस हजाराचा टप्पा पार पडला आहे. एकुण ४० हजार ३४ अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या असून ५हजार २८७ रूग्ण शोधण्यात यश मिळाल्याची माहिती नंदकिशोर साखला आणि डॉ. दीपक चोपडा यांनी दिली. या चाचण्यांमुळे ३४ हजार ७४७ नागरीकांना कोरोना नसल्याचे दिलासा मिळाला आहे.