मुलांना डांबून ठेवल्याचे आढळले
By admin | Published: December 3, 2014 02:05 AM2014-12-03T02:05:12+5:302014-12-03T02:08:56+5:30
मुलांना डांबून ठेवल्याचे आढळले
नाशिक : तिडके कॉलनीतील सेंट फ्रान्सिस हायस्कूलने केलेली फी वाढ शिक्षण मंडळाने बेकायदेशीर ठरविल्यानंतरही शालेय प्रशासन फी वसुलीसाठी प्रयत्नशील आहे़ शालेय व्यवस्थापनाने मंगळवारी मुलांच्या पालकांना दूरध्वनी करून फी न भरल्यास पाल्यास सोडणार नसल्याचे सांगितल्यानंतर शाळेत गेलेल्या पालकांना मुलांना डांबून ठेवल्याचे आढळले व त्यांचा शालेय प्रशासनाशी वाद झाला़
याबाबत पालकांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, शाळेच्या मुख्याध्यापकासह तिच्या पतीवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे़
सातपूरच्या महाराष्ट्र हौसिंग कॉलनीतील सचिन धर्मेंद्र सिन्हा यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा
मुलगा रुद्राक हा तिडके कॉलनीतील सेंट फ्रान्सिस हायस्कूलमध्ये
ज्युनिअर के.जी़मध्ये शिकतो़ शाळेने पालकांना कोणतीही पूर्वसूचना न देता सुमारे ३५ टक्के फी वाढ केली़
या विरोधात पालकांच्या आंदोलनानंतर शिक्षण प्रसारण अधिकाऱ्याने ही फी वाढ बेकायदेशीर ठरविली़ त्यामुळे जूनपासून पालकांनी शाळेची व बसची फी भरलेली नाही़
तसेच शाळेनेही याबाबत कळविलेले नाही़
मंगळवारी सकाळी मुलगा नेहमीप्रमाणे बसने शाळेत गेला़ त्यानंतर सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास शाळेतून फोन आला. त्यांनी शाळेची फी न भरल्यास तुमचा मुलगा घरी येणार नाही असे सांगून, फी भरा व तुमच्या मुलास घरी घेऊन जा असे सांगितले व नंतर पत्नीलाही असाच फोन केला गेला़