दिंडोरी तालुक्यातील निगडोळ येथे बिबट्याचे बछडे आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 12:19 AM2018-02-28T00:19:40+5:302018-02-28T00:19:40+5:30
दिंडोरी : तालुक्यातील निगडोळ येथे तुकाराम मालसाने यांच्या उसाची तोडणी सुरू असताना बिबट्याची मादी व तिची दोन बछडे आढळली.
दिंडोरी : तालुक्यातील निगडोळ येथे तुकाराम मालसाने यांच्या उसाची तोडणी सुरू असताना बिबट्याची मादी व तिची दोन बछडे आढळल्याने परिसरात घबराट पसरली असून, ग्रामस्थांनी पिंजरा लावण्याची मागणी केली आहे. तालुक्यातील निगडोळ येथील तुकाराम विश्वनाथ मालसाने यांच्या उसाच्या शेतात ऊस तोडणी सुरू असताना कामगारांना एक बिबट्या व दोन बछडे आढळले. कामगारांना बघून बिबट्या मादी नदीकडे निघून गेली तर बछडे उसातच राहिले. शेतकºयांनी ही माहिती उपसरपंच शरद मालसाने यांना दिली. त्यांनी वनाधिकारी सुनील वाडेकर यांच्याशी संपर्कसाधत त्यांना कळविले. वाडेकर यांनी तातडीने वनकर्मचारी यांच्यासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता तेथे त्यांना एक बछडा आढळून आला. त्यास मादी ज्या भागात गेली त्या कोलवन नदी परिसरातील झाडाझुडपाकडे सुरक्षितपणे हुसकून लावण्यात आले. सदर मादी बछड्यांना घेऊन जंगलात जाण्याचा अंदाज वनखात्याच्या अधिकाºयांनी व्यक्त केला आहे. दरम्यान ग्रामस्थांनी पिंजरा लावण्याची मागणी केली आहे, परंतु तूर्तास वनविभागाने येथे बंदोबस्त तैनात करत ग्रामस्थांचे प्रबोधन करत योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.