येवल्याचे संस्थापक : अभिमानास्पद कामगिरीचा नागरिकांकडून आढावा रघुजीराजे शिंदे यांचा यात्रोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 12:09 AM2018-04-18T00:09:13+5:302018-04-18T00:09:13+5:30

येवला : येवल्याचे संस्थापक रघुजीराजे शिंदे यांचा यात्रोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली.

Founder of YEVA: Yatra for Raghujiraj Shinde | येवल्याचे संस्थापक : अभिमानास्पद कामगिरीचा नागरिकांकडून आढावा रघुजीराजे शिंदे यांचा यात्रोत्सव

येवल्याचे संस्थापक : अभिमानास्पद कामगिरीचा नागरिकांकडून आढावा रघुजीराजे शिंदे यांचा यात्रोत्सव

Next
ठळक मुद्देरघुजीराजे शिंदे यांच्या मुखवट्याची मिरवणूक काढण्यात आली मशीद हा येवल्याचा हिंदू-मुस्लीम ऐक्याचा इतिहास रचला

येवला : येवल्याचे संस्थापक रघुजीराजे शिंदे यांचा यात्रोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली. मंगळवारी सकाळी कोपरगाव येथून गोदावरी नदीच्या पाण्याने भरून आणलेल्या ३५० कावडी गंगादरवाजा परिसरातील खंडू वस्ताद तालमीजवळ आल्या. पारंपरिक हलकडी, ढोल-ताशाच्या गजर व जयघोषात पालखीतून रघुजीराजे शिंदे यांच्या मुखवट्याची मिरवणूक काढण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या मिरवणुकीत खांद्यावर कावडी घेऊन निघालेल्या भाविकांसह लहान बालके आकर्षण ठरले. रघुजीराजे मंदिराजवळ आल्यानंतर ३५० कावडीतील पाण्याने मंदिरातील मूर्तीला अभिषेक करण्यात आला. यंदा तालुक्यातील राजापूर, कुसमाडी, बदापूर येथील भाविकांसह नगरसेवक डॉ. संकेत शिंदे, ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रभाकर झळके, नगरसेवक गणेश शिंदे, नगरसेवक प्रवीण बनकर, नगरसेवक रूपेश लोणारी, नगरसेवक अमजद शेख, नगरसेवक शफीक शेख, नगरसेवक सचिन मोरे, प्रभाकर शिंदे, पोलीसपाटील उत्तमराव शिंदे, सुभाष शिंदे, विलास शिंदे, नंदकुमार शिंदे, सुनील शिंदे, विजय शिंदे, प्रशांत शिंदे, आबासाहेब शिंदे, विजय शिंदे, संदीप शिंदे, योगेश शिंदे, बाळासाहेब शिंदे, सनी शिंदे, अशोक शिंदे, भाऊसाहेब शिंदे, नानासाहेब शिंदे, राहुल शिंदे, सुबोध शिंदे, उमेश शिंदे, सनी शिंदे, मुन्ना शिंदे, भय्या शिंदे आदींसह भाविक मोठ्या संख्येने कावडी मिरवणुकीत सहभागी झाले होते. मिरवणुकीनंतर गोदावरीच्या जलाने रघुजीराजे यांचा अभिषेक करण्यात आला. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे नियोजन विलास शिंदे, सुनील शिंदे, भास्करराव शिंदे, प्रभाकर शिंदे, सुभाष शिंदे, शरद शिंदे, गणेश शिंदे, प्रवीण शिंदे, रवि शिंदे, नाना शिंदे, योगेश शिंदे यांच्यासह रघुजीराजे उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले होते. बाळासाहेब कापसे यांच्या हस्ते सपत्नीक सत्यनारायण महापूजा होणार असून, छबिना मिरवणुकीने या उत्सवाची सांगता होणार आहे. सोळाव्या शतकात रघुजी राजेंनी स्थापन केलेल्या येवलेवाडीत हा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्र करून रघुजी राजे यांनी येवलेवाडी वसवली. या संंस्थापकाच्या स्मरणार्थ हा उत्सव साजरा करतात. या निमित्ताने मंदिर परिसरात मोठी यात्रा भरली.
ऐक्याचा इतिहास
रघुजीराजे शिंदे यांनी येवल्यात ३६० वर्षांपूर्वी मुस्लीम बांधवांसाठी नमाज पडण्यासाठी बांधलेली मशीद हा येवल्याचा हिंदू-मुस्लीम ऐक्याचा इतिहास रचला आहे. सामाजिक एकता राखण्याची परंपरा येवल्याने कायम राखली आहे. गेल्या दोन दिवसांपासून येवल्यातील भाविक रघुजी राजे शिंदे यांच्या दर्शनासाठी व यात्रेत गर्दी करत आहे.

Web Title: Founder of YEVA: Yatra for Raghujiraj Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Fairजत्रा