मुख्य भूमिगत जलवाहिनीच्या व्हॉल्व्हमधून कारंजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 11:53 PM2018-09-25T23:53:20+5:302018-09-26T00:10:24+5:30
पुणे महामार्गावरील डीजीपीनगर क्रमांक-१ येथून जाणाऱ्या जॉगिंग ट्रॅकवरून टाकण्यात आलेल्या मुख्य भूमिगत जलवाहिनीच्या व्हॉल्व्हला गळती लागली आहे. त्यामधून कारंजा उडत असून, शेकडो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. याकडे पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष होत असून, नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे.
नाशिक : पुणे महामार्गावरील डीजीपीनगर क्रमांक-१ येथून जाणाऱ्या जॉगिंग ट्रॅकवरून टाकण्यात आलेल्या मुख्य भूमिगत जलवाहिनीच्या व्हॉल्व्हला गळती लागली आहे. त्यामधून कारंजा उडत असून, शेकडो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. याकडे पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष होत असून, नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे. एकीकडे महापालिकेच्या वतीने पाणीपट्टी, घरपट्टीच्या देयकावर पाणीबचतीचे आवाहन केले जात असताना दुसरीकडे मनपाच्याच पाणीपुरवठा विभागाकडून या आवाहनाकडे दुर्लक्ष केले जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. महापालिकेच्या जलवाहिन्या व व्हॉल्व्हला शहरात वारंवार ठिकठिकाणी गळती लागून शेकडो लिटर पिण्याचे पाणी दररोज कुठे ना कुठे वाया जाते. आठवडाभरापासून या जलवाहिनीच्या व्हॉल्व्हमधून पाण्याचा कारंजा बाहेर उडत असून, याकडे अद्याप लोकप्रतिनिधी किंवा पाणीपुरवठा विभागाचे कर्मचाºयांचे लक्ष गेलेले नाही. चढ्ढापार्कवरून गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्राला जोडणाºया मोठ्या व्यासाच्या जलवाहिनीचा हा व्हॉल्व्ह असून, दिवसभर या जलवाहिनीमधील पिण्याचे पाणी व्हॉल्व्हभोवती केलेल्या हौदात वाहते. यामुळे पिण्याचे पाणी वाया जात असून, परिसरात डबके साचले आहेत. जलवाहिनीमधून पिण्याचे पाणी वाया जात असल्याचे काही नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर नागरिकांनी त्या व्हॉल्व्हवर प्लॅस्टिक ठेवून पाण्याचा अपव्यय थांबविण्याचा प्रयत्न केला, मात्र असफल ठरला.
डासांच्या उत्पत्तीचा धोका
व्हॉल्व्हच्या हौदातही स्वच्छ पाणी साचत असल्याने डेंग्यू, चिकुनगुण्या यांसारख्या आजाराचा फैलावाला कारणीभूत ठरणाºया एडीस डासाची उत्पत्तीस्थान निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना करून गळती थांबवावी, तसेच हौदाची स्वच्छता करून बंदीस्त करण्याची मागणी होत आहे.