येवल्यात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 08:20 PM2020-04-16T20:20:33+5:302020-04-17T00:31:43+5:30
येवला : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क वापरणे आवश्यक असताना, या नियमांचा भाजीपाला बाजारांमध्ये भंग होत असल्याचे गाव-खेड्यांमधून दिसून येत आहे.
येवला : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क वापरणे आवश्यक असताना, या नियमांचा भाजीपाला बाजारांमध्ये भंग होत असल्याचे गाव-खेड्यांमधून दिसून येत आहे. गर्दी टाळण्यासाठी नियमितपणे भरणारा येवला शहरातील भाजीबाजार बंद केला गेला. प्रमुख चौक, वसाहती व रस्त्यांवर भाजीपाला स्टॉल लावले गेले, मात्र, शनिपटांगणावरील भाजीपाला बाजार उठविल्यानंतर आता शहरातील मुख्य बाजारपेठेत लॉकडाउनमुळे बंद असणाऱ्या दुकानांच्या ओट्यांवर दुतर्फाभाजीपाला बाजार भरतो आहे. ताजा भाजीपाला मिळावा म्हणून या ठिकाणी खरेदीसाठी शहरवासीयांची सकाळी-सकाळी गर्दी होते. यावेळी सोशल डिस्टन्सिंग व मास्क नियमांचा अनेकांकडून भंग होतो. तालुक्यातील पाटोदा, अंदरसूल यासारख्या मोठ्या गावांमध्येही भाजीपाला बाजारात होणाºया गर्दीने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असल्याचे चित्र पुढे आले
आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गा वोगावचे आठवडे बाजार बंद केले आहेत, मात्र आठवडे
बाजारच्या दिवशी भाजीपाला बाजाराच्या निमित्ताने हे बाजार भरत असल्याचे चित्र आहे. नुकतेच बोकटे येथे पोलिसांना हस्तक्षेप करून गर्दी कमी करून सोशल डिस्टन्सिंगचा वापर करण्याची सक्ती करावी लागली होती. येवले शहरातही यापेक्षा काही वेगळे चित्र नाही.