शासकीय अन्नधान्य अपहार प्रकरणातील चार संशयितांची शरणांगती

By admin | Published: November 29, 2015 11:13 PM2015-11-29T23:13:47+5:302015-11-29T23:15:30+5:30

शासकीय अन्नधान्य अपहार प्रकरणातील चार संशयितांची शरणांगती

Four of the accused in the government's foodgrains discharge case | शासकीय अन्नधान्य अपहार प्रकरणातील चार संशयितांची शरणांगती

शासकीय अन्नधान्य अपहार प्रकरणातील चार संशयितांची शरणांगती

Next


घोटी : नाशिक जिल्ह्यातील शासकीय अन्नधान्याचा काळाबाजार करणाऱ्या धान्य माफियासह तिघे जण रविवारी पोलिसांना शरण आले. या चौघांनाही वाडीवऱ्हे पोलिसांनी अटक केले आहे. यातील मुख्य सूत्रधाराची बेहिशोबी सुमारे दीडशे कोटी रु पयाची मालमत्ता शासनाने काही महिन्यापूर्वीच जप्त केली होती.तर या सर्व संशियतावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती.
नाशिक जिल्ह्यातील शासकीय अन्नधान्याच्या गोदामातून अन्नधान्याची काळ्याबाजारात विक्र ी करणारी टोळी गेली अनेक वर्षापासून कार्यरत होती. यातील सुरगाणा आणि सिन्नर येथील धान्याच्या चोरीचा प्रकार काही महिन्यापूर्वी उघडकीस आला होता. याबाबत मुख्य संशियत आरोपी संपत नामदेव घोरपडे याच्यासह विश्वास नामदेव घोरपडे, मगन उर्फमदन रतन पवार, रमेश सोमनाथ पाटणकर आदिंवर पोलिसांनी मोक्का कायद्यानुसार गुन्हाही दाखल केला होता. मात्र हे सर्व संशियत गेल्या काही महिन्यांपासून फरार होते.
दरम्यान , मोक्का न्यायालयाने या संशियताची तब्बल दिडशे कोटी बेहिशोबी मालमत्ता सील केली होती. या सर्व संशयिताना शोधण्यासाठी पोलिसांनी धडक मोहीम राबविली होती. मात्र ते पोलिसांच्या हातात येत नव्हते. अखेर रविवारी हे चौघेही संशियत वाडीवऱ्हे पोलिसांना शरण आले असून या चौघांनाही पोलिसांनी अटक आहे.
याबाबत अधिक तपास जिल्हा पोलीस उपाधीक्षक छगन देवराज यांच्यासह वाडीवऱ्हेचे पोलीस निरीक्षक मनोहर पाटील कमलेश बच्छाव, नवनाथ पवार आदी करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Four of the accused in the government's foodgrains discharge case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.