जबरी लुटीतील चौघा आरोपींना सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 12:27 PM2018-10-21T12:27:33+5:302018-10-21T12:28:59+5:30
नाशिक : रिक्षा अडवून प्रवाशास लुटणाऱ्या चौघांना न्यायाधीश पा़ली़घुले यांनी शनिवारी (दि़२०) तिघा आरोपींना दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली़ सचिन सोपान गांगुर्डे, हर्षल जालिंदर भारती, सुनील प्रल्हाद भारती व असे शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत़ १३ जुलै २००७ रोजी घडलेल्या या गुन्ह्याचा तब्बल अकरा वर्षांनी निकाल लागला असून या कालावधीत आरोपी श्रावण लक्ष्मण भंडारी याचा मृत्यू झाला आहे़

१३ जुलै २००७ रोजी पहाटे सव्वातीन वाजेच्या सुमारास राहुल रंगनाथ तांबे व त्यांचे मामा हे डीजीपीनगर ते इंदिरानगर रिक्षाने जात होते़ यावेळी आरोपींनी रिक्षा अडवून तांबे व त्यांच्या मामास जबर मारहाण करून खिशातील मनगटी घड्याळ बळजबरीने काढून घेतले होते़ या प्रकरणी तांबे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़ तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक नंदकिशोर जगताप यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते़
न्यायाधीश घुले याच्या न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात सरकारी वकील एस़एम़वाघचौरे यांनी साक्षीदारांची घेतलेली साक्ष व परिस्थितीजन्य पुरावे यावरून आरोपींना दोषी धरून दोन वर्षे सक्तमजुरी , ५०० रुपये दंड, दंड न भरल्यास १५ दिवस साध्या कैदेची शिक्षा सुनावली़