सातपूर पोलीस ठाण्यासाठी साडे चार कोटी रुपयांचा निधी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 10:37 PM2020-10-08T22:37:30+5:302020-10-09T01:20:31+5:30
सातपूर : तीस वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या सातपूर पोलीस ठाण्याचे लवकरच रुपडे पालटणार असून, त्यासाठी शासनाने साडे चार कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याने बांधकामाची निविदा देखील निघाली आहे. परिसराची वाढती लोकसंख्या पाहता सातपूर पोलीस ठाण्याला अद्ययावत आणि सुसज्ज इमारतींची आवश्यकता होती.

सन १९७८ साली सातपूर पोलीस ठाण्याची इमारत बांधण्यात आली आहे. त्यावेळी केवळ सातपूर गाव, पिंपळगाव बाहुला अशी तुरळक वस्ती होती. या तीस वर्षात सातपूर औद्योगिक वसाहतीमुळे परिसराचा प्रचंड प्रमाणात विस्तार झालेला आहे. सातपूर कॉलनी,सोमेश्वर कॉलनी,समतानगर,श्रीकृष्ण नगर,अशोकनगर, राज्यकर्मचारी वसाहत,जाधव संकुल,श्रमिक नगर, राधाकृष्ण नगर,सुरदर्शन कॉलनी,खोडे पार्क,जाधव टाऊनशिप,कामगार नगर,सदगुरु नगर,काळे मळा,खांदवे नगर,अंबड लिंकरोड अशी वस्ती आणि वसाहती वाढत आहेत. वाढती लोकसंख्या पाहता सातपूर पोलीस ठाण्याची इमारत जुनाट झाल्याने नवीन अद्ययावत आणि सुसज्ज अशी इमारत बांधण्यात यावी म्हणून शासकीय पातळीवर सातत्याने प्रयत्न सुरु होते. या इमारतीत वरिष्ठ पोलिस निरीक्षक कक्ष, दुय्यम पोलिस निरीक्षक कक्ष, सहा सहाय्यक पोलिस निरीक्षक कक्ष, महिला अधिकारी कक्ष, ठाणे अमलदार कक्ष व इतर विभाग असतील.तसेच पोलिस कस्टडीची सुविधाही असणार आहे.
याबाबत शासनाकडे पाठपुरावा करुन इमारतीसाठी साडे चार कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन आणला आहे.इमारत बांधकामाची निविदा देखील प्रसिद्ध झाली आहे. लवकरच बांधकामाला सुरुवात होणार आहे.आणि सुसज्ज इमारत उभारण्याची नागरिकांची मागणी पूर्ण होणार आहे.
-सीमा हिरे.आमदार