डीबीटीचे साडेचार हजार अर्ज प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2020 09:50 PM2020-09-03T21:50:44+5:302020-09-04T00:56:05+5:30
नाशिक : विद्यार्थ्यांनी भरलेल्या विविध शिष्यवृत्ती अर्जांची विहित कालावधीमध्ये पडताळणी करण्याची गरज असतानाही डीबीटी डॅशबोर्डनुसार अद्याप ४ हजार ४४८ विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयांच्या स्तरावर पडताळणीसाठी प्रलंबित असल्याचे आढळले आहे.
नाशिक : विद्यार्थ्यांनी भरलेल्या विविध शिष्यवृत्ती अर्जांची विहित कालावधीमध्ये पडताळणी करण्याची गरज असतानाही डीबीटी डॅशबोर्डनुसार अद्याप ४ हजार ४४८ विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयांच्या स्तरावर पडताळणीसाठी प्रलंबित असल्याचे आढळले आहे. उच्चशिक्षण विभागाने विद्यार्थी हिताच्या दृष्टीने महाविद्यालय व विभागस्तरावर प्रलंबित अर्जांची पडताळणी करण्यासाठी अंतिम मुदतवाढ देण्याबाबत शासनास विनंती केली होती. त्यानुसार, शासनाच्या महाआयटी कार्यालयाने सन २०१९-२० करीता महाडीबीटी पोर्टलवरुन आॅनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांनी भरलेल्या शिष्यवृत्ती अजार्ची महाविद्यालयाच्या स्तरावरून पडताळणी करण्यासाठी दि. १० सप्टेंबर तसेच विभाग स्तरावरूनपडताळणीसाठी १५ सप्टेंबर अशी अंतिम मुदतवाढ दिली आहे.