ग्रामीण भागात पाच वर्षांत साडेचार हजार मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:14 AM2021-01-21T04:14:36+5:302021-01-21T04:14:36+5:30

--- नाशिक : शहराच्या तुलनेत ग्रामीण जनतेमध्ये वाहतूक नियमांच्या बाबतीत कमालीची उदासीनता व निरक्षरता पहावयास मिळते. मागील पाच वर्षांमध्ये ...

Four and a half thousand deaths in five years in rural areas | ग्रामीण भागात पाच वर्षांत साडेचार हजार मृत्यू

ग्रामीण भागात पाच वर्षांत साडेचार हजार मृत्यू

Next

---

नाशिक : शहराच्या तुलनेत ग्रामीण जनतेमध्ये वाहतूक नियमांच्या बाबतीत कमालीची उदासीनता व निरक्षरता पहावयास मिळते. मागील पाच वर्षांमध्ये नाशिकच्या ग्रामीण भागात तब्बल ९ हजार ९४३ अपघात घडले. यामध्ये सुमारे ४ हजार ७०५ लोकांना अप‌घातात आपला जीव गमवावा लागला आहे. हा आकडा अत्यंत चिंताजनक असून, रस्ता सुरक्षा अभियानात शहराबरोबरच ग्रामीण जनतेमध्येही व्यापक व प्रभावीपणे जनजागृती करण्याची गरज आहे.

शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात वाहनांची संख्या कमी असते; परिणामी रस्त्यांवर वर्दळही अत्यल्प असते, तरीदेखील ग्रामीण भागात अपघातांचे प्रमाण दरवर्षी वाढतच आहे. नाशिक ग्रामीणमध्ये २०१५साली तब्बल २ हजार२४० अपघात झाल्याची नोंद प्रादेशिक परिवहन विभागाकडे आहे. तसेच सर्वाधिक ८२४ अपघाती मृत्यू २०१८साली झाले होते. गेल्यावर्षी ग्रामीण भागातील रस्त्यांवरील अपघातात ८०१ लोकांना आपले प्राण गमवावे लागले. ग्रामीण भागातून राष्ट्रीय, राज्य व अन्य महामार्ग जातात. या महामार्गांवर अपघाताचे प्रमाण अधिक आहे. रस्ते सुरक्षा अभियानात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व राज्य मार्ग प्राधिकरणाने अवजड वाहनचालकांसह हलके वाहन भरधाव दामटविणाऱ्यांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात वाढते अपघाताचे प्रमाण रोखण्याचे मोठे आव्हान प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ), ग्रामीण वाहतूक पोलिसांसमोर आहे; मात्र यासाठी संबंधितांकडून केवळ दंडात्मक कारवाईचा (वसुली) उपाय अंमलात आणला जातो. दंड वसूल झाला की पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या...’ असेच चित्र रस्त्यांवर पहावयास मिळते. राज्य, राष्ट्रीय महामार्ग आणि त्यांना जोडणाऱ्या विविध गाव, वस्ती, मळ्यांमध्ये जाणारे जोडरस्ते त्याचप्रमाणे ग्रामीण भागात वाहतूक नियमांची पायमल्ली करत केली जाणारी सार्वजनिक प्रवासी वाहतूक, शेतमालाची वाहतूक अशा अनेकविध कारणांमुळे अपघातांना निमंत्रण मिळत असते.

---इन्फो--

रस्त्यांची दुर्दशा मोठे कारण

ग्रामीण भागातील रस्त्यांची झालेली दुर्दशा हे अपघातांमागील मोठे कारण आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वर्षानुवर्षे रस्त्यांची दुरुस्ती केली जात नाही आणि खड्ड्यांमुळे रस्त्यांची अक्षरश: चाळण झालेली दिसते. जिल्ह्यातील विविध तालु्क्यांमध्ये महत्त्वाच्या रस्त्यांची बिकट अवस्था झालेली असून, वारंवार तक्रार करूनदेखील रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती होत नसल्याने अपघातांचा आलेख वाढतच आहे.

----इन्फो----

अपघातप्रवण स्थळांच्या सुरक्षेकडे काणाडोळा

ग्रामीण भागातील विविध रस्त्यांवर असलेल्या अपघातप्रवण स्थळांकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जाते. अपघाती स्थळ सुरक्षित करण्याबाबत कोणत्याही उपाययोजना होत नसल्याने वर्षानुवर्षांपासून अपघाती स्थळ, धोकादायक वळणांवर अपघातांना निमंत्रण मिळत आहे.

---इन्फो--

वर्षनिहाय मृत्यूचे प्रमाण असे...

२०१५- ७९०

२०१६- ७७४

२०१७- ७३३

२०१८- ८२४

२०१९- ७८३

२०२०- ८०१

----इन्फो--

अपघातांची टक्केवारी अशी...

राष्ट्रीय महामार्ग : ३२%

राज्य महामार्ग : २०%

अन्य मार्ग : ४८%

---इन्फो--

वाहनांच्या प्रकारानुसार अपघात असे...

मोटारसायकल : ५०%

चारचाकी कार : २६%

बस : २.११%

अन्य वाहने : २१.७६%

---इन्फो--

तालुकानिहाय अपघातांची टक्केवारी

मालेगाव : १७ %

सिन्नर : १४%

इगतपुरी : ३१%

त्र्यंबकेश्वर : ४%

निफाड : १२ %

येवला : ५%

नाशिक : ३%

---

फोटो क्र : १०पीएचजेएन६२ : आडगावजवळ काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातातील छायाचित्र :

Web Title: Four and a half thousand deaths in five years in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.