जनावरांची तस्करी करणाऱ्या चौघांना वाहनांसह अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 08:46 PM2019-10-12T20:46:50+5:302019-10-12T20:46:56+5:30

जायखेडा : गाई व गोºहे पिकअप वाहनात निर्दयीपणे कोंबून गुजरातकडून मुल्हेरमार्गे मालेगावकडे कत्तलसाठी चोरटी वाहतूक करणाºया चार आरोपींना जायखेडा पोलिसांनी ताहराबाद चौफुलीवर ताब्यात घेतले. पोलिसांनी तस्करीसाठी वापरण्यात येणाºया दोन पिकअप वाहनांसह एकूण सहा लाख ५२ हजारांचा ऐवज हस्तगत केला असून, त्यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Four arrested for trafficking animals with vehicles | जनावरांची तस्करी करणाऱ्या चौघांना वाहनांसह अटक

जनावरांची तस्करी करणाऱ्या चौघांना वाहनांसह अटक

Next
ठळक मुद्देजायखेडा : पोलिस तपासणी मोहिमेत आढळले १५ गायी, गोºहे

जायखेडा : गाई व गोºहे पिकअप वाहनात निर्दयीपणे कोंबून गुजरातकडून मुल्हेरमार्गे मालेगावकडे कत्तलसाठी चोरटी वाहतूक करणाºया चार आरोपींना जायखेडा पोलिसांनी ताहराबाद चौफुलीवर ताब्यात घेतले. पोलिसांनी तस्करीसाठी वापरण्यात येणाºया दोन पिकअप वाहनांसह एकूण सहा लाख ५२ हजारांचा ऐवज हस्तगत केला असून, त्यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जायखेडा पोलिस ठाण्याचे स्वप्निल कोळी, सुनिल पाटील, निंबा खैरनार, उमेश पाटील, भालचंद्र नेरकर, उमेश भदाणे, राजेंद्र गायकवाड, भवर आदी कर्मचारी गस्तीवर असताना शुक्रवारी (दि.११) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास अंतापुर-ताहराबाद चौफुलीवर गुजरातकडून मालेगावकडे भरधाव वेगाने जाणाºया दोन पिकअप (एम एच ०४ डि के ६३८८), (एम एच ०४ डी एस ६९३५) अडविली असता चालकाने उडवा उडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांना संशय आला. त्यांनी या दोन्ही वाहनांची तपासणी केली असता यात जवळ पास पंधरा गायी व गोºहे निर्दयीपणे कोंबलेले आढळले.
पोलिसांनी चालक मुस्तफा खान अफजल खान, शेख रईस शेख युनुस, नईम अहेमद हाफीज अहेमद अन्सारी, शेख रिजवान शेख मुख्तार (रा. मालेगाव) यांना अटक केली.
ताब्यात घेतलेल्या जनावरांना गंभीर जखमा झाल्या होत्या. जायखेडा पोलिस स्टेशन आवारात जनावरांवर खाजगी पशुवैद्य कपिल अहिरे व सहकाऱ्यांनी उपचार केले. गावकºयांनी जनावरांच्या चाºयाची व्यवस्था केली. दरम्यान वाहनात एक वासरू सदर वाहनामध्ये गुदमरल्याने मरण पावले. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Four arrested for trafficking animals with vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.