शहरातून बुलेटसह चार दुचाकींची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 01:16 AM2018-12-17T01:16:40+5:302018-12-17T01:17:01+5:30
शहरात वाहनचोरीचे सत्र सुरूच असून शहरातील विविध भागांतून चोरट्यांनी ९० हजार रुपये किमतीच्या बुलेटसह ६८ हजार रुपयांच्या चार दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली आहे़ या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात दुचाकीचोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़
नाशिक : शहरात वाहनचोरीचे सत्र सुरूच असून शहरातील विविध भागांतून चोरट्यांनी ९० हजार रुपये किमतीच्या बुलेटसह ६८ हजार रुपयांच्या चार दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली आहे़ या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात दुचाकीचोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़
टाकळी रोडवरील शांतीपार्कमधील रहिवासी समीर धोपावकर यांची ९० हजार रुपये किमतीची ग्रे कलरची रॉयल इनफिल्ड बुलेट (एमएच १५, जीई ९६५३) चोरट्यांनी बिल्डिंगच्या पार्किंगमधून चोरून नेली़ या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात दुचाकीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
सिडकोतील राजरत्ननगरमधील रहिवासी बापू पवार यांची २० हजार रुपये किमतीची लाल रंगाची बजाज बॉक्सर दुचाकी (एमएच १५, एएल १५९२) चोरट्यांनी ठक्कर बाजारमधील हॉटेलच्या पार्किंगमधून चोरून नेली़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दुचाकीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
सीबीएसजवळील कान्हेरेवाडीतील रहिवासी राजेंद्र सुराणा (रा़रामकृपा बिल्डिंग) यांची ३० हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची पॅशन प्रो दुचाकी (एमएच १५, ईटी ४४६७) चोरट्यांनी घराजवळून चोरून नेली़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात दुचाकीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
चोरीच्या घटना रोखण्याची मागणी
च्देवळाली कॅम्प परिसरातील लोहशिंगवे परिसरातील रहिवासी किसन पाटोळे यांची १८ हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची स्प्लेंडर प्लस (एमएच १५, सीए १६२७) दुचाकी चोरट्यांनी घराजवळून चोरून नेली़ या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात दुचाकीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, शहरातील वाढत्या दुचाकीचोरीच्या घटना रोखण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते आहे़