शहर परिसरातून चार दुचाकींची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 11:26 PM2017-11-01T23:26:31+5:302017-11-02T00:13:52+5:30
शहरातील दुचाकी चोरीला आळा घालण्यास पोलिसांना अपयश येत असून, दुचाकी चोरीचे सत्र सुरूच आहे़ शहरातील विविध भागातून दुचाकी चोरट्यांनी दोन अॅक्टिवा, प्लेझर व सीबीझेड अशा चार दुचाकी चोरून नेल्या आहेत. याप्रकरणी पोलीस ठाण्यांमध्ये चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़
नाशिक : शहरातील दुचाकी चोरीला आळा घालण्यास पोलिसांना अपयश येत असून, दुचाकी चोरीचे सत्र सुरूच आहे़ शहरातील विविध भागातून दुचाकी चोरट्यांनी दोन अॅक्टिवा, प्लेझर व सीबीझेड अशा चार दुचाकी चोरून नेल्या आहेत. याप्रकरणी पोलीस ठाण्यांमध्ये चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ तपोवनरोड परिसरातील रहिवासी हेमलता मिलिंद बच्छाव (रा. कर्मा हाईट्स, तपोवनरोड) या नातेवाइकांना भेटण्यासाठी पखालरोड परिसरात गेल्या होत्या. त्यांनी आपली प्लेझर (एमएच १५, डीपी ८३००) दुचाकी इच्छामणी बंगल्यासमोर उभी केली असता चोरट्यांनी चोरून नेली़ या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात झाल्यानंतर पोलिसांनी रामवाडी येथील संशयित ईश्वर राजेंद्र गुरगुडे (१९ रा. रामवाडी) या युवकास ताब्यात घेतले आहे़ दुचाकी चोरीची दुसरी घटना फाळकेरोड परिसरात घडली़ अब्दुला हाफिस चिरागउद्दीन कोकणी (रा. गुलजार मेन्शन, फाळकेरोड) यांची अॅक्टिव्हा (एमएच १५, डीझेड ८६९२) दुचाकी चोरट्यांनी त्यांच्या घरासमोरून चोरून नेली़ याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दुचाकी चोरीची तिसरी घटना नाशिकरोड परिसरात घडली़ प्रकाश नारायण देशमुख (रा. हेरंब अपा. कुलकर्णी मंगल कार्यालयाजवळ) यांची अॅक्टिवा (एमएच १५, एफजी ३३२३) दुचाकी चोरट्यांनी वैष्णव हाईट इमारतीसमोरून चोरून नेली़ याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पंचवटीतील इंद्रकुंड परिसरातून दुचाकी चोरून नेल्याची चौथी घटना घडली़ राहुल चंद्रकांत गुजरे (रा. गंगोत्री अपा.) यांची सीबीझेड (एमएच ०३, एयू ०८८२) दुचाकी चोरट्यांनी सोसायटीच्या पार्किंगमधून चोरून नेली़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़