शहरातून चार दुचाकींची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 11:40 PM2018-11-21T23:40:53+5:302018-11-22T00:15:35+5:30

वाहन चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली असून, शहरातील विविध परिसरातून चोरट्यांनी चार दुचाकी चोरून नेल्या आहेत़ या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 Four bikes steal from the city | शहरातून चार दुचाकींची चोरी

शहरातून चार दुचाकींची चोरी

Next

नाशिक : वाहन चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली असून, शहरातील विविध परिसरातून चोरट्यांनी चार दुचाकी चोरून नेल्या आहेत़ या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील शरयू पार्कमधील रहिवासी अशोक मोहिते यांची डिस्कव्हर दुचाकी (एमएच १७, झेड ९८५९) चोरट्यांनी बालाजी अपार्टमेंटमधून चोरून नेली़ या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़  पंचवटीतील निमाणी बस स्टॅण्डसमोरील सूर्या आर्केडमध्ये लावलेली राहुल देसले यांच्या मालकीची होंडा अ‍ॅक्टिवा दुचाकी (एमएच १५, सीपी ९८११) चोरट्यांनी चोरून नेली़ या प्रकरणी प्रकाश वाघ यांच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
निफाड तालुक्यातील कसबे-सुकेणे येथील मयूर भंडारे यांची डिस्कव्हर दुचाकी (एमएच १५, डीई ४०७३) चोरट्यांनी टाकळी रोडवरील सेंट झेवियर स्कूलजवळून चोरून नेली़ या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ नाशिकरोडच्या जयाबाई कॉलनीतील प्राईड ग्लोरी सोसायटीतील रहिवासी मनीषा गोडगे यांची होंडा अ‍ॅक्टिवा दुचाकी (एमएच १५, जीबी १२८०) चोरट्यांनी सोसायटीच्या पार्किंगमधून चोरून नेली़ या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
कृषी प्रदर्शनातील अ‍ॅल्युमिनियम पार्टिशनची चोरी
सिटी सेंटर मॉलजवळील ठक्कर डोम येथे सुरू होणाऱ्या कृषी प्रदर्शनाच्या ठिकाणाहून चोरट्यांनी ९० हजार रुपये किमतीच्या अ‍ॅल्युमिनियम पार्टिशन चोरून नेल्याची घटना घडली आहे़ ईश्वरभाई बोराणा (रा़ सोमेश्वरनगर, वासना, अहमदाबाद) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कृषीथॉन प्रदर्शनासाठी तयार करण्यात येत असलेल्या सेटअपवरून १६ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत चोरट्यांनी ६०० किलो अ‍ॅल्युमिनियमचे मटेरीयल चोरून नेले़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
गांधी तलावाजवळ मृत अर्भक आढळले
रामकुंडाजवळील गांधी तलावाजवळ मंगळवारी (दि़२०) सकाळच्या सुमारास मृतावस्थेतील बेवारस अर्भक आढळून आले़ पाच ते सहा दिवसांचे हे स्त्री जातीचे अर्भक असून, या प्रकरणी अज्ञात महिलेविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला  आहे़

Web Title:  Four bikes steal from the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.