सभापतींविरुद्ध भाजपाच्या चार सदस्यांचे बंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 11:27 PM2017-09-26T23:27:09+5:302017-09-27T00:31:33+5:30
महापालिकेतील स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी विविध सभांमध्ये घेतलेल्या निर्णयांना आक्षेप घेणाºया शिवसेना, कॉँग्रेस, राष्टÑवादी, अपक्ष सदस्यांच्या सुरात सूर मिसळवत सत्ताधारी भाजपाच्या चार सदस्यांनी आपल्याच सभापतींविरुद्ध बंड पुकारले आहे. स्थायीच्या दहा सदस्यांनी नगरसचिवांना पत्र देऊन काही सभांची इतिवृत्ते मंजूर करू नये, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे स्थायी समितीतील संघर्ष आता चव्हाट्यावर आला आहे.
नाशिक : महापालिकेतील स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी विविध सभांमध्ये घेतलेल्या निर्णयांना आक्षेप घेणाºया शिवसेना, कॉँग्रेस, राष्टÑवादी, अपक्ष सदस्यांच्या सुरात सूर मिसळवत सत्ताधारी भाजपाच्या चार सदस्यांनी आपल्याच सभापतींविरुद्ध बंड पुकारले आहे. स्थायीच्या दहा सदस्यांनी नगरसचिवांना पत्र देऊन काही सभांची इतिवृत्ते मंजूर करू नये, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे स्थायी समितीतील संघर्ष आता चव्हाट्यावर आला आहे. सोमवारी (दि.२५) झालेल्या स्थायी समितीच्या सभेत शिवसेनेसह अन्य विरोधी पक्षांच्या सदस्यांनी काही सभांची इतिवृत्ते मंजूर करण्यास विरोध दर्शविला होता. मात्र, सभापतींनी त्याची दखल न घेतल्याने विरोधकांनी गोंधळ घातला होता. याशिवाय, काही प्रस्तावांनाही आक्षेप घेण्यात आला होता. परंतु, त्यालाही सभापतींनी दाद न दिल्याने शिवसेना, राष्टÑवादी व अपक्ष सदस्यांनी सभात्याग केला होता. मंगळवारी (दि.२६) स्थायी समितीतील शिवसेनेचे सदस्य सूर्यकांत लवटे, भागवत आरोटे, प्रवीण तिदमे, अपक्ष मुशिर सय्यद, राष्ट्रवादीचे राजेंद्र महाले, कॉँग्रेसच्या वत्सला खैरे यांच्यासह भाजपाचे मुकेश शहाणे, जगदीश पाटील, सुनीता पिंगळे व श्यामकुमार बडोदे यांनी आपल्या स्वाक्षºयांचे पत्र नगरसचिवांना देत काही सभांची इतिवृत्ते मंजूर करण्यास विरोध दर्शविला. पत्रात आक्षेप घेताना म्हटले आहे, सभा क्रमांक १४ मध्ये नियमित बैठकीत नसलेले जादा विषय नंतर टाकण्यात आले आहेत. तसेच अनेक आक्षेपार्ह विद्युत विभागाच्या निविदांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे सभा क्रमांक ७, १५, १७ आणि १८ ची इतिवृत्ते मंजूर करू नये. भूसंपादनाचेही विषय बहुमताने फेटाळण्यात आले आहेत. ग्रीन जीमच्या संदर्भातही प्रशासनाच्या भूमिकेत सुस्पष्टता नाही, बिटको रुग्णालयातील विद्युत साधनांच्या खरेदीबाबतचाही विषय तहकूब ठेवण्यात आलेला आहे. डिझायनरच्या फी संदर्भात रक्कम नमूद नाही आणि नियुक्तीचा कालावधीदेखील जास्त आहे. त्यामुळे महापालिकेच्या हिताचा विचार करून निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. याच आशयाचे पत्र दहा सदस्यांनी सभापतींनाही दिले आहे. विशेष म्हणजे, भाजपाच्या चार सदस्यांनीही विरोधकांच्या सुरात सूर मिसळविल्याने स्थायीत भाजपांतर्गत संघर्ष उफाळून आला आहे. सत्ताधारी भाजपातील असमन्वयाचेही दर्शन यानिमित्ताने समोर आले आहे. शिस्तबद्ध समजल्या जाणाºया भाजपातील चार सदस्यांनी आपल्याच सभापतींविरुद्ध अविश्वास दाखवत दंड थोपटल्याने पक्षश्रेष्ठी आता त्याबद्दल काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून राहणार आहे.