विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सोडणार चार बसेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 12:39 AM2017-09-02T00:39:41+5:302017-09-02T00:40:05+5:30
नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे-पळसे व इतर बसथांब्यांवरील विद्यार्थ्यांसाठी सिन्नर आगारातून सकाळी चार जादा बसेस सोडण्यात येणार असल्याचे बैठकीप्रसंगी एस.टी. महामंडळाच्या विभागीय नियंत्रक अधिकारी यामिनी जोशी यांनी जाहीर केले. आमदार योगेश घोलप यांच्या मध्यस्थीने झालेल्या बैठकीत बसेस सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
नाशिकरोड : नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे-पळसे व इतर बसथांब्यांवरील विद्यार्थ्यांसाठी सिन्नर आगारातून सकाळी चार जादा बसेस सोडण्यात येणार असल्याचे बैठकीप्रसंगी एस.टी. महामंडळाच्या विभागीय नियंत्रक अधिकारी यामिनी जोशी यांनी जाहीर केले. आमदार योगेश घोलप यांच्या मध्यस्थीने झालेल्या बैठकीत बसेस सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून शिंदे-पळसे- नानेगाव, जाखोरी- नायगाव सकाळ सत्रातील बसेस महामंडळाने अचानक बंद केल्याने विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयांत जाण्यास अडचण निर्माण झाली होती. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. तसेच कामगार व इतर प्रवाशांना नाशिकरोड, नाशिक शहरात येण्यासाठी अडचण निर्माण झाली होती. सिन्नर डेपोच्या नाशिक शहरात सकाळी येणाºया अनेक बसेस शिंदे पळसे आदि बसथाब्यांवर सकाळी थांबत नव्हत्या बसेस रिकाम्या असताना सुद्धा बसचालक, वाहक बसेस थांबवत नसल्याने दोन दिवसांपूर्वी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थांनी सिन्नरकडून येणाºया बसेस अडवून रास्ता रोको केला होता. ग्रामीण भागातील विद्यार्थी, ग्रामस्थ व कामगार यांची गरज लक्षात घेऊन आमदार घोलप यांनी एस.टी. महामंडळाच्या अधिकारी यामिनी जोशी यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली. आमदार घोलप यांच्या कार्यालयात घोलप, विभागीय नियंत्रक अधिकारी यामिनी जोशी, विद्यार्थी व पालकांची संयुक्त बैठक पार पडली. तसेच सिन्नर डेपोतून चार वाढीव बसेस सकाळी ६ ते ८ या वेळेत सोडण्यात येईल व त्या बसेस महामार्गावरील सर्व बसथांब्यावर थांबतील, असे जोशी यांनी स्पष्ट केले. बैठकीला प्रकाश म्हस्के, विद्यार्थी सेनेचे राहुल धात्रक, प्रमोद गायधनी, राजू फोकणे, बबलू टिळे, अंबादास कळमकर, योगेश देशमुख, नवनाथ गायधनी, संजय गायधनी, संजय चिडे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.