एक्स्प्रेसचे तीन डबे रुळावरून घसरल्याने चार तास वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 02:27 AM2018-06-11T02:27:15+5:302018-06-11T02:27:15+5:30
इगतपुरी : रविवारी (दि. १०) पहाटेच्या सुमारास इगतपुरी रेल्वेस्थानकाजवळ एक ते दीड किमी अंतरावर मुंबईहून हावडाकडे जाणाऱ्या एक्स्प्रेसचे तीन डबे रुळावरून घसरल्याची घटना इगतपुरी तीनलकडी पुलाजवळ घडली. यावेळी तत्काळ आपत्कालीन बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. तीन डबेच रेल्वे रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक पाच तास ठप्प झाली.

या अपघातामुळे मनमाडहून मुंबईला जाणाºया बºयाच एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे अतोनात हाल झाले, तर मुंबईला जाणाºया प्रवाशांना इगतपुरी ते कसारा खासगी वाहनाने प्रवास करत पुढील प्रवास लोकलने करावा लागला.
रविवारी रात्री २ वाजेच्या सुमारास मुंबईहून हावडाकडे जाणाºया मुंबई-
हावडा एक्स्प्रेसचे तीन डबे इगतपुरी रेल्वेस्थानकाजवळील तीनलकडी पुलाजवळ घसरल्याने दोन्ही
बाजूची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती
या अपघातात प्रवाशांना किरकोळ मार लागला असून, मोठी जीवितहानी टळली. अपघाताची माहिती समजताच रेल्वे प्रशासनाचे आपत्कालीन बचाव पथक घटनास्थळी दाखल होऊन घसरलेले डबे काढण्याचे काम त्यांनी युद्धपातळीवर सुरू केले. हावडा मेलचे उर्वरित डबे कसारामार्गे मागे नेऊन पुन्हा इगतपुरी रेल्वेस्थानकात आणून प्रवाशांची सुटका करून इतर गाडीने त्यांना मार्गस्थ करण्यात आले. या अपघातामुळे रात्री २ ते सकाळी ७ वाजेपर्यंत मुंबईला जाणारी व नाशिकला येणारी रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती२
या ठिकाणी जवळपास शंभर ते दीडशे कर्मचारी
युद्धपातळीवर काम करत होते. इगतपुरी परिसरात रात्री
२ वाजेपासून पाच ते सहा तास गाडीमधील प्रवाशांना ताटकळत बसावे लागले होते, तर मुंबईहून येणाºया रेल्वेगाड्या
उशिरा धावत होत्या. अपघातामुळे मुंबईला जाणारी राज्यराणी
एक्स्प्रेस, पंचवटी एक्स्प्रेस, गोदावरी एक्स्प्रेस आदी गाड्या रद्द करण्यात आल्या, तर लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या मार्गामध्ये बदल करण्यात आले..