निफाड तालुक्यात चार कोविड केअर सेंटर प्रस्तावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 11:26 PM2020-04-13T23:26:28+5:302020-04-13T23:27:24+5:30

निफाड तालुक्यात चार कोविड केअर सेंटरची निर्मिती प्रस्तावित असून, १२ विविध ठिकाणी विलगीकरण केंद्राची उभारणी केली असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी दिली. निफाड पंचायत समिती येथे आरोग्य विभाग व पोषण आहार विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

Four Covid Care Centers proposed in Niphad taluka | निफाड तालुक्यात चार कोविड केअर सेंटर प्रस्तावित

निफाड तालुक्यात चार कोविड केअर सेंटर प्रस्तावित

googlenewsNext
ठळक मुद्देबाळासाहेब क्षीरसागर : पंचायत समितीत आढावा

निफाड पंचायत समितीत आढावा बैठकीत बोलताना जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर. समवेत उपसभापती शिवा सुरासे, निवृत्ती जगताप, गटविकास अधिकारी संदीप कराड आदी.
निफाड/लासलगाव : निफाड तालुक्यात चार कोविड केअर सेंटरची निर्मिती प्रस्तावित असून, १२ विविध ठिकाणी विलगीकरण केंद्राची उभारणी केली असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी दिली. निफाड पंचायत समिती येथे आरोग्य विभाग व पोषण आहार विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
निफाड पंचायत समितीच्या सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, पंचायत समिती उपसभापती शिवा सुराशे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जगताप, गटविकास अधिकारी संदीप कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्यावर चर्चा करण्यासाठी आढावा बैठक संपन्न झाली.
निफाड तालुक्यात लासलगाव, पिंपळगाव बसवंत, निफाड व भाऊसाहेबनगर या ठिकाणी कोविड केअर सेंटर प्रस्तावित असून, त्या ठिकाणची पाहणी करण्यात आलेली आहे. तर तालुक्यात चांदोरी, सायखेडा, पिंपळगाव बसवंत, देवगाव मौजे सुकेणे, ओझर, विंचूर, पालखेड, नैताळे, उगाव, लासलगाव, पिंपळगाव नजीक या १२ ठिकाणी कोरोना संशयित विलगीकरण केंद्र उभारण्यात आलेले आहेत.
तालुक्यात असलेल्या सर्व ग्रामपंचायतीनुसार सुमारे ३७० टीम करण्यात आल्या असून, यामध्ये आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्यसेवक यांचा समावेश आहे. ते घरोघरी जाऊन आजारपणाची व नव्याने बाहेरगावहून आलेल्या इसमाची माहिती व नागरिकांची माहिती घेऊन निफाड पंचायत समितीला कळविणार असून, त्याची नोंद ठेवली जाणार आहे. या तयार करण्यात आलेल्या टीमचे सनियंत्रण प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व मुख्य सेविका यांच्याकडे तर मुख्य नियंत्रण गटविकास अधिकारी संदीप कराड यांच्याकडे असणार आहे.
बैठकीस सहाय्यक गटविकास अधिकारी रविकांत सानप, प्रशासनाधिकारी प्रशांत शेळके, विस्ताराधिकारी कैलास गादड, रविकांत सोनवणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नवलसिंग चव्हाण, महिला बालकल्याण अधिकारी अभिमान माने, गटशिक्षणाधिकारी केशव तुंगार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Four Covid Care Centers proposed in Niphad taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.