निवडणूक कामांच्या खर्चासाठी चार कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2020 12:17 AM2020-11-11T00:17:39+5:302020-11-11T00:18:06+5:30

मतदार याद्या अद्ययावत करणे तसेच त्यांचे मुद्रण करण्यासाठी होणारा खर्च तसेच निवडणूक कर्मचाऱ्यांचे थकलेले मानधन अदा करण्यासाठी नाशिक जिल्हा निवडणूक शाखेला राज्य शासनाने चार कोटींची निधी वितरीत केला आहे. त्यामुळे निवडणूक कामांची रखडलेली बिले आणि बीएलओ यांचे अनुदान लवकरच वितरीत केले जाणार आहे.

Four crore for election expenses | निवडणूक कामांच्या खर्चासाठी चार कोटी

निवडणूक कामांच्या खर्चासाठी चार कोटी

Next
ठळक मुद्देअनुदान प्राप्त : निवडणूक कर्मचाऱ्यांना मिळणार मानधन

नाशिक : मतदार याद्या अद्ययावत करणे तसेच त्यांचे मुद्रण करण्यासाठी होणारा खर्च तसेच निवडणूक कर्मचाऱ्यांचे थकलेले मानधन अदा करण्यासाठी नाशिक जिल्हा निवडणूक शाखेला राज्य शासनाने चार कोटींची निधी वितरीत केला आहे. त्यामुळे निवडणूक कामांची रखडलेली बिले आणि बीएलओ यांचे अनुदान लवकरच वितरीत केले जाणार आहे.

निवडणूक कामांच्या खर्चासाठी मागणी केल्याप्रमाणे जिल्ह्यासाठी ४ कोटी २६ लाख ४१ हजार ३३१ इतके अनुदान वितरीत करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने काढले आहेत. मतदार यादी व बीएलओ रजिस्टर छपाई करण्यासाठी २६ लाख २७ हजार ३३१, माहे एप्रिल २०१९ ते मार्च २०२० या कालावधीत बीएलओ यांच्या मानधनासाठी २ कोटी, ६६ लाख , ७६ हजार, तर एप्रिल ते सप्टेंबर २०२० या कालावधी देण्यात येणाऱ्या थकीत मानधनासाठी १ कोटी ३३ लाख ३८ हजार इतके अनुकदान मंजूर करण्यात आले आहे.

बोगस मतदानाला आळा घालण्यासाठी तसेच मयत आणि दुबार मतदारांना यादीतून वगळण्यासाठी जिल्ह्यात व्यापक मतदार याद्या पडताळणीच मोहीम राबविली जाते. यासाठी निवडणूक कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पडताळणीचे काम झाल्यानंतर अंतिम मतदार यादी छपाई केली जाते. या सर्व कामांवर कोट्यवधींचा खर्च होत असल्याने शासनाकडे मागणी नोंदविण्यात आली होती. त्यानुसार जिल्ह्याला निधी प्राप्त झाला आहे. जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या अनुदानानुसार निवडणुकीवरील खर्चाचा तपशील सादर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.

Web Title: Four crore for election expenses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.