सिलिंडर स्फोटातील मृतांची संख्या चार

By admin | Published: November 5, 2016 11:12 PM2016-11-05T23:12:14+5:302016-11-05T23:13:29+5:30

पिंपळगाव बसवंत : जखमी चिमुरड्याचा मृत्यू

Four cylinders were killed in the explosion | सिलिंडर स्फोटातील मृतांची संख्या चार

सिलिंडर स्फोटातील मृतांची संख्या चार

Next

पिंपळगाव बसवंत : येथील पवनसुतनगर येथे झालेल्या सिलिंडर स्फोटातील मृतांची संख्या चार झाली असून, जखमींपैकी रोहन शरद शिंदे (८) याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
गुरुवारी (दि. ३) सायंकाळी साडेसहा वाजता पवननगर या मजूर वस्तीवर गॅस सिलिंडर स्फोटात मोहिनी भाऊसाहेब पवार (३१) ही महिला व करण कृष्णा वळवी (८), रोहिनी शरद शिंदे (४) हे ९० टक्के भाजल्याने मृत झाले होते. यापैकी या गंभीर जखमी रोहन शरद शिंदेवर नाशिक येथे उपचार सुरू होते. मात्र आज त्याची प्राणज्योत मालवली. त्यामुळे स्फोटातील मृतांची संख्या चार झाली आहे.
दिवाळीला नवीन गॅस घरात आल्याने आनंदात असलेले मोतीराम हरी लिलके यांच्या कुटुंबावर इतके मोठे संकट उभे राहील याची कल्पनाही नव्हती. उज्ज्वला गॅस मिळाला. या योजनेच्या नावाखाली या कुटुंबाने सोळासे रुपयेही दिले. मात्र एजन्सीकडून गॅस वापराची अथवा जोडण्याची कुठलीही माहिती का दिली नाही. या घटनेत चार जणांना जीव गमवावा लागला आहे. यातील मोहिनी भाऊसाहेब पवार ही दीड महिनाच्या लहान बाळाला झोपवून गॅस बघायला आली आणि काळाने तिच्यावर झडप घातली. तिला अजून दोन लहान मुली आहेत. भाऊबीजेसाठी आलेली माहेरवाशीण केवळ रिक्षा पंक्चर झाली व नवीन गॅस आला म्हणून त्यावर सायंकाळी स्वयंपाक करून गोड जेवणाच्या आशेवर असलेले रोहिणी व शरद या दोन्ही मुलांना जीव गमवावा लागला आहे.

Web Title: Four cylinders were killed in the explosion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.