गणेशोत्सवात चार दिवस ध्वनिक्षेपकाला परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 01:00 AM2017-08-31T01:00:41+5:302017-08-31T01:00:46+5:30

सहा दिवस पावसामुळे आनंदावर विरजण पडलेल्या गणेशभक्तांना आगामी चार दिवस रात्री बारा वाजेपर्यंत देखावे व मिरवणुकीसाठी ध्वनिक्षेपक, वाद्य वाजविण्याची अनुमती जिल्हाधिकाºयांनी दिली असून, यासंदर्भात पोलिसांचा असलेला विरोध डावलण्यात आला आहे.

Four days in the Ganesh Festival allow for the soundtrack | गणेशोत्सवात चार दिवस ध्वनिक्षेपकाला परवानगी

गणेशोत्सवात चार दिवस ध्वनिक्षेपकाला परवानगी

googlenewsNext

नाशिक : सहा दिवस पावसामुळे आनंदावर विरजण पडलेल्या गणेशभक्तांना आगामी चार दिवस रात्री बारा वाजेपर्यंत देखावे व मिरवणुकीसाठी ध्वनिक्षेपक, वाद्य वाजविण्याची अनुमती जिल्हाधिकाºयांनी दिली असून, यासंदर्भात पोलिसांचा असलेला विरोध डावलण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत वाद्य तसेच ध्वनिक्षेपक वाजविण्यास बंदी घालण्यात आलेली आहे, मात्र सण, उत्सवाच्या काळात हे बंधन शिथिल करण्यात आले असून, त्यासाठी काही दिवस मुभा देण्यात आली आहे. या निर्णयाचा आधार घेत राज्य सरकारने यंदा पाच दिवसांची वाढीव मुदत दिली असून, एकूण पंधरा दिवसांपैकी आॅगस्टपर्यंत त्यातील पाच दिवस संपलेले आहेत. आगामी दहा दिवसांमध्ये कोणत्या दिवशी वाद्य व ध्वनिक्षेपकासाठी अनुमती द्यायची याचे अधिकार जिल्हाधिकाºयांना दिले होते व त्यानुसार जिल्हाधिकाºयांनी पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षकांना पत्र देऊन शिफारस मागविली होती. मंगळवारी पोलिसांचे अहवाल जिल्हाधिकाºयांना प्राप्त झाले. त्यात गणेशोत्सवाच्या दुसºया दिवशी, गौरी आगमन, गौरी विसर्जन व अनंत चतुर्दशी या चार दिवशी रात्री बारापर्यंत अनुमती देण्यास हरकत नसल्याचे म्हटले होते. या साºया गोष्टींचा विचार करून जिल्हाधिकाºयांनी बुधवारी आपल्या अधिकाराचा वापर करून आदेश जारी केले आहेत. त्यात दि. ३१ आॅगस्ट रोजी गौैरी विसर्जनासाठी तसेच दि. ३, ४, ५ सप्टेंबर सलग तीन दिवस देखावे व गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वाजविण्यास मुभा देण्यात आली आहे.

Web Title: Four days in the Ganesh Festival allow for the soundtrack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.