सटाण्यात चार दिवसाआड पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 12:13 AM2018-03-22T00:13:08+5:302018-03-22T00:13:08+5:30

तालुक्यातील ठेंगोडा येथील गिरणा नदीपात्र कोरडेठाक झाल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ठेंगोडा पाणीपुरवठा योजनेच्या विहिरींनीदेखील तळ गाठला आहे. त्यामुळे शहरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

Four days in water | सटाण्यात चार दिवसाआड पाणी

सटाण्यात चार दिवसाआड पाणी

Next

सटाणा : तालुक्यातील ठेंगोडा येथील गिरणा नदीपात्र कोरडेठाक झाल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ठेंगोडा पाणीपुरवठा योज नेच्या विहिरींनीदेखील तळ गाठला आहे. त्यामुळे शहरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे.  पालिका प्रशासनाने पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारपासून १२ एप्रिलपर्यंत चार दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी ठेंगोडा नदीपात्रातून तसेच आरम नदीपात्रातून पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली आहे. यंदा मार्च महिन्याच्या मध्यावरच शहरात पाणीटंचाईने डोकेवर काढले आहे. गिरणा व आरम नदीपात्र पूर्णपणे कोरडे झाल्याने पाणीपुरवठा योजनांच्या विहिरींनी तळगाठले आहे.
पाण्याअभावी पाणीपुरवठा योजना विस्कळीत झाल्याने पालिका प्रशासनाने आता पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे. चणकापूर व केळझर या मध्यम प्रकल्पांच्या पुढील आवर्तनापर्यंत ही पाणी कपात केली असून, मंगळवारपासून चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी हेमलता डगळे यांनी सांगितले. सहा जलकुंभमधून पाण्याचे नियोजन करून वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. राजमाता जिजाऊ जलकुंभमधून अभिमन्यूनगर, शांतीनगर, महाबीज परिसर, शिवाजी नगर, भाक्षीरोडमधील वसाहतीसाठी २० मार्च ते ९ एप्रिलपर्यंत पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. याच जलकुंभामधून श्रीकृष्णनगर, क्रांतीनगर, सन्मित्र हौसिंग त्रिवेणी संगम, वृंदावन कॉलनी, समर्थनगर वसाहतीत २२ मार्च ते ११ एप्रिलपर्यंत चार दिवसाआड पाणीपुरवठा होईल. कै. तुकाराम सोनवणे जलकुंभामधून मित्रनगर, गणेशनगर, पीडीपीनगर, न्यू प्लॉट, श्यामजीनगर वसाहतीत व उपासनी रोड, देवी गल्ली, संभाजी रोड, नामपूरचाळ, महात्मा गांधी रोड, फुले रोड वसाहतीमध्ये अनुक्र मे २० मार्च ते ९ एप्रिल व २२ मार्च ते ११ एप्रिलपर्यंत पाणीपुरवठा करण्यात येईल.

Web Title: Four days in water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी