जिल्ह्यात चार, तर पोर्टलवर २९० बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 01:46 AM2021-06-19T01:46:27+5:302021-06-19T01:47:23+5:30
जिल्ह्यात शुक्रवारी (दि. १८) कोरोनाचे एकूण ४ बळी गेले असून, पोर्टलवर तब्बल २९० बळी अपडेट करण्यात आले आहेत. दरम्यान, दिवसभरात एकूण १९८ रुग्ण बाधित आढळले असून २४४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
नाशिक : जिल्ह्यात शुक्रवारी (दि. १८) कोरोनाचे एकूण ४ बळी गेले असून, पोर्टलवर तब्बल २९० बळी अपडेट करण्यात आले आहेत. दरम्यान, दिवसभरात एकूण १९८ रुग्ण बाधित आढळले असून २४४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
जिल्ह्यात पोर्टलवरील बळी अपडेट करण्याचे काम शुक्रवारी सुरूच होते. अपडेट केलेल्या २९० बळींमध्ये १७५ मनपाच्या, तर नाशिक ग्रामीणच्या ११५ मृतांचा समावेश आहे. तसेच जिल्ह्यात प्रत्यक्षात गेलेले चारही बळी हे नाशिक ग्रामीणचे आहेत. पोर्टलवरील या सर्व बळींमुळे जिल्ह्यातील एकूण बळींची संख्या तब्बल ७५२५ वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात उपचारार्थी रुग्णसंख्येत अजून घट आली असून ही संख्या ३१४१ पर्यंत खाली आली आहे. दरम्यान प्रलंबित अहवालांची संख्या पुन्हा एकदा हजारच्या खाली ८९० पर्यंत आली आहे. त्यात नाशिक ग्रामीणचे ४५५, नाशिक मनपाचे १५८, तर मालेगाव मनपाच्या २७७ अहवालांचा समावेश आहे.
इन्फोे
कोरोनामुक्त ९७.२८ टक्के
जिल्ह्यात रुग्ण कोरोनामुक्त होण्याच्या प्रमाणातही किंचितशी वाढ झाली आहे. शुक्रवारी हे प्रमाण सरासरी ९७.२८ टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यात नाशिक मनपा ९७.८६, नाशिक ग्रामीण ९६.४८, मालेगाव मनपा ९६.२४, तर जिल्हाबाह्य ९७.४५ इतके आहेत. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी पहिल्या लाटेनंतरदेखील ९८ टक्क्यांपर्यंत पोहोचली होती. मात्र, त्यानंतरही पुन्हा दुसरी लाट उसळल्याने अजूनदेखील नागरिकांनी दक्षता घेण्याची गरज असल्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.