चार ड्रोन : मालेगाव महापालिका निवडणुकीवर ‘ड्रोन’ची नजर

By Admin | Published: May 22, 2017 07:35 PM2017-05-22T19:35:34+5:302017-05-22T19:35:34+5:30

मालेगाव महापालिकेच्या मतदानाच्या दिवशी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अर्थात चार ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर केला जाणार आहे़

Four drones: Drones' look at Malegaon municipal elections | चार ड्रोन : मालेगाव महापालिका निवडणुकीवर ‘ड्रोन’ची नजर

चार ड्रोन : मालेगाव महापालिका निवडणुकीवर ‘ड्रोन’ची नजर

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : सार्वत्रिक निवडणुकांच्या मतदानासाठी गत काही वर्षांपासून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अर्थात इव्हिएम मशिनचा वापर केला जातो़ तर मतदानाच्या दिवशी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, शांततेत प्रक्रिया पार पडावी यासाठी पोलीस दल तैनात केले जाते़ मात्र, पोलिसांना काम करताना अडचणी लक्षात घेऊन मालेगाव महापालिकेच्या मतदानाच्या दिवशी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अर्थात चार ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर केला जाणार आहे़ महापालिका निवडणुकीसाठी राज्यात पहिल्यांदाच ड्रोनचा वापर केला जात असल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे यांनी सोमवारी (दि़२२) पत्रकार परिषदेत दिली़
मालेगाव महापालिकेसाठी बुधवारी (दि़२४) मतदान होत असून ८४ जागांसाठी ३७४ उमेदवार रिंगणात आहेत़ तर एक नगरसेवक निवडणुकीपुर्वीच बिनविरोध निवडून आला आहे़ मालेगाव महापालिकेसाठी पूर्व व पश्चिम मालेगाव असे भाग असून पूर्व भागात मुस्लिम संख्या अधिक तर पश्चिम मालेगावमध्ये हिंदूची संख्या अधिक आहे़ पूर्व भागातील काही मतदान केंद्रे ही संवेदनशील असून तेथील मतदान केंद्रांसाठी जागेचे आकारमान मतदारसंख्येच्या तुलनेने कमी आहे़ पूर्व मालेगावातील काही शाळांच्या मतदान केंद्रावर २६ पर्यंत बुथची संख्या असल्याने अशा ठिकाणी एकाच वेळी गर्दी होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो़

Web Title: Four drones: Drones' look at Malegaon municipal elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.