रानडुकराच्या हल्यात चार शेतकरी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 02:39 PM2018-08-09T14:39:48+5:302018-08-09T14:39:56+5:30
नामपुर : बागलाण तालुक्यातील बोडरी येथे डाळिंब बागेत काम करत असताना अचानक जंगली डुकराने केलेल्या हल्ल्यात चार शेतकरी जखमी झाले आहेत.
नामपुर : बागलाण तालुक्यातील बोडरी येथे डाळिंब बागेत काम करत असताना अचानक जंगली डुकराने केलेल्या हल्ल्यात चार शेतकरी जखमी झाले आहेत. बोडरी येथील शेतकरी दादाजी पंडित अहिरे यांच्या शेतात संजय बारकु खैरनार , पुंडलिक शिवराम खैरनार ,मांगू महादु अहिरे , पोपट पांडुरंग खैरनार हे चौघे डाळिंब बागेत काम करीत असताना सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास बागेत अचानक जंगली डुकराने प्रवेश काम करत शेतकऱ्यांवर हल्ला केला .यात शेतकºयांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र रानडुकराने जोरात हल्ला केल्यामुळे सर्व शेतकरी जखमी झाले . जखमीना तात्काळ नामपुरच्या ग्रामीण रु ग्णा लयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती गावातील सामाजिक कार्यकर्ते हेमंत ठाकरे यांनी वन खात्याला व पोलिस ठाण्याला दिली. घटनेची माहिती मिळताच वन कर्मचारी राजेन्द्र साळुंखे , एन आर नेमाडे पोलिस अधिकारी एस आर गुरव ,श्रीराम कोळी यांनी पंचनामा केला असून . जास्त जखमी झालेल्याना मालेगाव येथील सामान्य रु ग्णालयात पाठवण्यात आला. या घटनेमुळे नामपुरसह काटवन परिसरात घबराट निर्माण झाली असून या भागातील जंगली प्राण्याचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी चिराईचे सरपंच डॉ शेषराव पाटील , खालचे टे भे सरपंच भाऊसाहेब अहिरे ,बोडरीचे माजी चेअरमन हेमंत ठाकरे , गंगाधर अहिरे , सेवानिवृत्त मुख्याध्यापक बी एस ठाकरे यांनी वन खात्याकडे केली आहे .