चौघा परप्रांतीयांना एटीएम फोडतानाच रंगेहात अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2022 01:43 AM2022-06-27T01:43:01+5:302022-06-27T01:43:24+5:30
अशोकनगर येथील एटीएम फोडणाऱ्या चौघा संशयित परप्रांतीयांना सातपूर पोलिसांनी रंगेहाथ पकडले असून यात उत्तर प्रदेशातील कानपूरच्या कबीरगाव येथील सनी राजेश कुशवाह (१९) व श्रीराम गोरेलाल गौतम (१९) अंशु रमेशचंद कुशवाह (२४) 24 व फत्तपूरच्या फरसदेपूर येथील अभिषेक धनराजसिंग चौहान (२०) यांचा समावेश आहे. पोलिसांनी चौघाही चोरट्यांना अटक केली असून त्यांच्याकडून एटीएम फोडण्याच्या कृत्याचे प्रात्यक्षिकही करून घेतले.
सातपूर : अशोकनगर येथील एटीएम फोडणाऱ्या चौघा संशयित परप्रांतीयांना सातपूर पोलिसांनी रंगेहाथ पकडले असून यात उत्तर प्रदेशातील कानपूरच्या कबीरगाव येथील सनी राजेश कुशवाह (१९) व श्रीराम गोरेलाल गौतम (१९) अंशु रमेशचंद कुशवाह (२४) 24 व फत्तपूरच्या फरसदेपूर येथील अभिषेक धनराजसिंग चौहान (२०) यांचा समावेश आहे. पोलिसांनी चौघाही चोरट्यांना अटक केली असून त्यांच्याकडून एटीएम फोडण्याच्या कृत्याचे प्रात्यक्षिकही करून घेतले.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, शनिवारी (दि.२५) दुपारच्या सुमारास युनियन बँकेच्या मुंबई येथील मुख्यालयाकडुन दूरध्वनीद्वारे संदेश आला की,अशोकनगर येथील युनियन बँकेचे एटीएम कोणीतरी फोडत आहे. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब वाघ यांनी संजय शिंदे, शरद झोले, अनंत महाले, संभाजी जाधव आदी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. तोपर्यंत चोरट्यांनी एटीएम फोडून पलायन केले होते. एटीएम फोडल्याचे पाहून पोलिसांनी चोरट्यांचा परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली. युनियन बँकेचे एटीएम फोडून त्यांच्या हाती काहीही लागले नाही म्हणून या चोरट्यांनी नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील पपय्या नर्सरी चौकातील महाराष्ट्र बँकेचे एटीएमवर डल्ला मारण्याचा प्रयत्न केला. याठिकाणी एटीएम फोडत असतांना पोलिसांनी चौघा चोरट्यांना रंगेहात पकडले. हे तिघेही संशयित परप्रांतीय असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन एटीएम कशा पद्धतीने फोडले याचे प्रात्यक्षिक करून घेतले.