चार पाड्यांमध्ये चार वनराई बंधारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2020 07:24 PM2020-12-10T19:24:00+5:302020-12-11T01:05:39+5:30

त्र्यंबकेश्वर : तालुक्यात वनराई बंधारे बांधण्यास लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने १०१ किंवा त्यापेक्षा अधिक वनराई बंधारे बांधण्याचा संकल्प लवकरच पूर्ण करणार असल्याचे या संकल्पनेचे जनक पोपट महाले व त्यांचे सहकारी यांनी सांगितले.

Four forest dams in four padas | चार पाड्यांमध्ये चार वनराई बंधारे

सावरपाडा येथे वनराई बंधारा बांधताना ग्रामस्थ आदी.

Next
ठळक मुद्दे वनराई बंधाऱ्याचे महत्त्व पटले असल्याने ते स्वतःहून भाग घेत आहेत.

त्र्यंबकेश्वर : तालुक्यात वनराई बंधारे बांधण्यास लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने १०१ किंवा त्यापेक्षा अधिक वनराई बंधारे बांधण्याचा संकल्प लवकरच पूर्ण करणार असल्याचे या संकल्पनेचे जनक पोपट महाले व त्यांचे सहकारी यांनी सांगितले.

विशेष म्हणजे जलयुक्त शिवारमध्ये ज्या यंत्रणा कार्यरत होत्या, त्यातील कृषी विभागालादेखील वनराई बंधाऱ्याचे महत्त्व पटले असल्याने ते स्वतःहून भाग घेत आहेत.
जलयुक्तला लोकसहभाग असताना सिमेंट आदी सामान खरेदीसाठी पैसे उपलब्ध होत होते. जलयुक्त शिवार योजनेचा उद्देश व वनराई बंधारे बांधून शेतीला पाणी उपलब्ध करणे, वापरण्यासाठी पाणी उपलब्ध करणे. वाहते पाणी असल्यास परिसरात परक्युलेशनमुळे ओलावा टिकून राहणे. त्या ओलाव्याचा उपयोग शेतीला करण्याचा उद्देश आहे. तथापि, एप्रिल, मे, जूनपर्यंत वनराई बंधाऱ्यात पाणी असणे गरजेचे आहे.

खरशेत ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सावरपाडा मुरुमहट्टी येथे जवळपास ५०० रिकाम्या गोण्याचा आनओहळ येथे ग्रामस्थांच्या श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला आहे. तर देवडोंगरा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ३०० काकडदरीत २०० ओझरखेड, खडक ओहळ येथे प्रत्येकी ५० रिकाम्या गोणीत माती टाकून वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत.
यावेळी सरपंच विठ्ठल दळवी, भास्कर भोंबे, कृष्णा राऊत, हरिदास राऊत, अंबादास पवार, अंबादास गांगोडे, गोपाळ राऊत, तुकाराम राऊत, यादव पवार, लता पवार, मंदा पवार, अशोक कर्डेक, अशोक गायकवाड, संतोष गाडर, शमनोज चौधरी, भगवान चौधरी, चिमणा महाले, दिनेश भुसारे, भगवान भोये, किसन गांगोडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
 

Web Title: Four forest dams in four padas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.