चार शासकीय कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 11:21 PM2020-03-19T23:21:11+5:302020-03-20T00:04:10+5:30
खडी क्रशर यंत्र चालविण्याचा परवाना देण्याचा मोबदला म्हणून १० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दोघांना तर बिअर शॉपी परवाना मंजुरीसाठी उत्पादन शुल्क विभागाला लागणारा ना-हरकत दाखल देण्याच्या मोबदल्यात कनिष्ठ अधिकाºयासह वरिष्ठ सहायकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (दि.१९) लाचेची रक्कम स्विकारताना रंगेहाथ ताब्यात घेतले.
नाशिक : खडी क्रशर यंत्र चालविण्याचा परवाना देण्याचा मोबदला म्हणून १० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दोघांना तर बिअर शॉपी परवाना मंजुरीसाठी उत्पादन शुल्क विभागाला लागणारा ना-हरकत दाखल देण्याच्या मोबदल्यात कनिष्ठ अधिकाºयासह वरिष्ठ सहायकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (दि.१९) लाचेची रक्कम स्विकारताना रंगेहाथ ताब्यात घेतले.
तक्रारदाराने घोटी येथील खडी क्रशर यंत्राचा परवाना मिळविण्यासाठी अर्ज केला होता. त्या मोबदल्यात क्षेत्रिय अधिकारी प्रकाश धुमाळ यांनी २५ हजारांची लाचेची मागणी केली होती. धुमाळ हे १० हजार रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले गेले. याच कार्यालयातील क्षेत्रिय अधिकारी दिनेशभाई भिका वसावा यांनीही संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले.