वडाळागावातील चार घरकुले सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 03:53 PM2020-01-13T15:53:15+5:302020-01-13T15:54:17+5:30

वडाळा गावातील घरकुल योजनेत एकूण नऊ इमारती आहेत. या इमारतींमध्ये सुमारे ७२० सदनिका असून, त्यापैकी सुमारे ३५० रहिवाशांनी आपली घरे भाडेतत्त्वावर दिली आहेत.

Four house seals in Wadalagaon | वडाळागावातील चार घरकुले सील

वडाळागावातील चार घरकुले सील

Next
ठळक मुद्देभाडेकरू ठेवले : महापालिकेची कारवाई

लोकमत प्रभाव
नाशिक : वडाळागाव घरकुल योजनेतील निवासस्थानाचा गैरवापर केला जात असल्याबाबत होत असलेल्या तक्रारींची दखल घेत महापालिकेच्या पश्चिम विभागाचे वतीने घरकुल योजनेतील घरांची तपासणी केली असता चार घरकुले मालकांनी भाडेकरूंंना दिल्याचे आढळून आल्याने ही चारही घरे सील करण्याची कारवाई करण्यात आली. काही दिवसांपूर्वी ‘लोकमत’ने यासंदर्भात सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते.
वडाळा गावातील घरकुल योजनेत एकूण नऊ इमारती आहेत. या इमारतींमध्ये सुमारे ७२० सदनिका असून, त्यापैकी सुमारे ३५० रहिवाशांनी आपली घरे भाडेतत्त्वावर दिली आहेत. त्यासाठी मांगिरबाबा चौक ते पांढरी चौक या शंभर फुटी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या अनधिकृत झोपड्या महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पोलिसांचा फौजफाटा घेऊन जमीनदोस्त केल्या होत्या. तेथील रहिवासी आणि गंजमाळ परिसरातील रहिवाशांचे आधार कार्ड, रेशन कार्ड आदी कागदपत्रांची तपासणी करून महापालिकेने लाभार्थी निवडले होते व त्यांना सुमारे दोन वर्षांपूर्वी घरकुल योजनेतील घरे वाटप केली. मात्र यापैकी काही जणांना घरकुल योजनेची गरज नसतानाही घरे घेतली आहेत. तर काही जण स्वत:च्या पक्क्या घरात वास्तव करीत आहेत. त्यामुळे खऱ्या लाभार्थ्यांना घरांपासून वंचित रहावे लागत आहे. ज्यांना गरज नाही अशा मिळकतधारकांनी घरकुल योजनेतील घरे भाडेतत्त्वावर देण्याचा व्यवसाय सुरू केला असून, जेव्हा मनपाच्या वतीने घरात लाभार्थी राहतो की नाही तपासण्यासाठी अधिकारी व कर्मचारी येतात त्यावेळी त्यांना आधीच माहिती होत असल्याने त्यावेळेस स्वत: लाभार्थी घरी हजर राहतो. त्यामुळे मनपा अधिकारी व कर्मचारी रिकाम्या हाताने परत जातात. अलीकडेच यासंदर्भातील लोकमत वृत्ताची दखल घेत महापालिकेच्या पश्चिम विभागाचे विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत अचानक वडाळागावातील घरकुल योजनेत जाऊन सदर घरकुलांमध्ये मालक राहतो की भाडेकरू याची तपासणी केली असता चार घरांमध्ये भाडेकरू आढळून आले आहेत. अशा घरांचा पंचनामा करून सील करण्यात आले आहे. सदर मोहीम कायमस्वरूपी राबवण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, वडाळा गावातील घरकुल योजनेतील सुमारे ५० टक्के घरे संबंधित लाभार्थ्यांनी भाडेतत्त्वावर दिली असल्याचे काही लाभार्थ्यांनी सांगितले. ज्या ठिकाणाहून झोपडपट्टी उठवण्यात आली त्याठिकाणी कुंपण करण्यात आले नाही त्यामुळे शहर झोपडपट्टीमुक्त कसे होणार आणि स्मार्ट सिटी कसे होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

Web Title: Four house seals in Wadalagaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.