चारशे पन्नास ट्रान्स्फाॅर्मर व्हेंटिलेटरवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:14 AM2021-05-27T04:14:25+5:302021-05-27T04:14:25+5:30

गोरख घुसळे, पाटोदा : येथील वीज वितरणच्या सबस्टेशन अंतर्गत गाव आणि परिसरातील गावांना तसेच वाडी-वस्त्यांना वीजपुरवठा सुरळीत व पुरेशा ...

Four hundred and fifty transformers on the ventilator | चारशे पन्नास ट्रान्स्फाॅर्मर व्हेंटिलेटरवर

चारशे पन्नास ट्रान्स्फाॅर्मर व्हेंटिलेटरवर

Next

गोरख घुसळे, पाटोदा : येथील वीज वितरणच्या सबस्टेशन अंतर्गत गाव आणि परिसरातील गावांना तसेच वाडी-वस्त्यांना वीजपुरवठा सुरळीत व पुरेशा दाबाने व्हावा यासाठी बसविण्यात आलेल्या सुमारे चारशे पन्नास ट्रान्स्फाॅर्मर्सची अवस्था बिकट झाली असून, ते अखेरची घटका मोजत व्हेंटिलेटरवर तग धरून आहेत.

ट्रान्स्फाॅर्मर्समध्ये वारंवार बिघाड होत असल्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. वीज वितरणने झोपेचे सोंग न घेता पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

पाटोदा येथील वीज वितरणच्या सबस्टेशनमधून पाटोदा, दहेगाव पाटोदा, ठाणगाव, पिंपरी, निलखेडे, सोमठाणदेश, आंबेगाव, शिरसगाव, वळदगाव, लौकी या गाव व वाड्या-वस्त्यांना वीजपुरवठा केला जात आहे. या भागातील सर्वच वीजवाहिन्या लोंबकळत्या स्थितीत असून अनेक खांबही वाकले आहेत. सर्वच ट्रान्स्फाॅर्मर्सवरील डिस्ट्रिब्युशनपेटीतील फ्यूज फुटलेल्या अवस्थेत असून फ्यूजऐवजी तारा वापरलेल्या असल्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

..................................................

मनुष्यहानीची भीती :

कोणत्याही ट्रान्स्फाॅर्मरच्या फ्यूजपेटीत एकही फ्यूज नाही. आलेल्या मुख्य वाहिनीलाच तारा जोडून पुढे पुरवठा दिला जात आहे. तसेच बाहेरील बाजूच्या मुख्य केबलवरील प्लॅस्टिक आवरण जळून गेलेल्या स्थितीत असून, संपूर्ण वाहिन्या उघड्या पडलेल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत दुर्घटना घडून वित्त व मनुष्यहानीची भीती व्यक्त केली जात आहे.

...................................

महावितरणने तत्परता दाखवावी

शेतकरी अथवा सर्वसामान्य ग्राहकाकडे वीजबिल थकले तर महावितरण तत्परता दाखवून कोणतीही पूर्वसूचना न देता वीजजोडणी तोडून वीजपुरवठा खंडित करते, मात्र वीजवाहिन्या, वाकलेले खांब,ट्रान्स्फाॅर्मर,फ्यूज आदींची दुरुस्ती करण्यात महावितरणकडून अशी तत्परता का दाखवली जात नाही, असा सवाल वीजग्राहकांकडून उपस्थित केला जात आहे.

...................................

रोहित्र जळण्याचे प्रमाण वाढले

रोहित्राकडे येणारा वीजवाहिन्यांचा सप्लाय लोंबकळणाऱ्या व फुटलेल्या चिमण्या वारा तसेच पावसामुळे होणारे ब्रेकडाऊन तसेच खांबावरील चिमणी (इन्सुलेटर) फुटल्याने वीज गूल होण्याचे प्रमाण वाढले आहे. पावसाळ्याच्या दिवसांत डिस्ट्रिब्युशन बॉक्समधील गपमध्ये पावसाचे पाणी शिरताच ते खराब होणे, उघड्या केबलमध्ये पाणी गेल्याने केबल ब्लास्ट होणे, असे प्रकार वारंवार घडत असल्याने बिघाड होऊन रोहित्र जळण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे विद्युत उपकरणांचे तसेच शेतकऱ्यांचे वीजपंप खराब होऊन आर्थिक नुकसान होत आहे. सर्वच रोहित्रांची दुरवस्था झाल्याने नागरिक वारंवार याबाबतची कल्पना अधिकारी वर्ग तसेच कर्मचारी वर्गाला देत आले आहेत, मात्र कोणत्याही रोहित्राची दुरुस्ती केली जात नाही. (२६ पाटोदा १/२)

===Photopath===

260521\26nsk_4_26052021_13.jpg

===Caption===

२६ पाटोदा १/२

Web Title: Four hundred and fifty transformers on the ventilator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.