येवल्यात चारशे किलो प्लॅस्टिक पिशव्या जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 07:06 PM2018-11-03T19:06:55+5:302018-11-03T19:07:31+5:30

येवला : शासनाच्या आदेशानुसार प्लॅस्टिक बंदीची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी शहरातील यंत्रणा सरसावली आहे. शहरात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पालिकेच्या वतीने अचानक काही दुकानांमध्ये धाडी टाकून सुमारे चारशे किलो प्लॅस्टिक पिशव्या जप्त करून २५ हजारांवर दंड आकारण्यात आला.

Four hundred kilo plastic bags seized in Yeola | येवल्यात चारशे किलो प्लॅस्टिक पिशव्या जप्त

येवल्यात चारशे किलो प्लॅस्टिक पिशव्या जप्त

Next
ठळक मुद्दे २५ हजारांवर दंड आकारण्यात आला.

येवला : शासनाच्या आदेशानुसार प्लॅस्टिक बंदीची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी शहरातील यंत्रणा सरसावली आहे. शहरात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पालिकेच्या वतीने अचानक काही दुकानांमध्ये धाडी टाकून सुमारे चारशे किलो प्लॅस्टिक पिशव्या जप्त करून २५ हजारांवर दंड आकारण्यात आला.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ नाशिक पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिवसभरात येथील काही दुकानांवर धाडी टाकून प्लॅस्टिक पिशव्या
जप्त केल्या आहेत. या सर्वांना पाच हजार रु पयांपर्यंतचा दंड आकारण्यात आला असून, तंबीदेखील देण्यात आली आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी पी. एम. जोशी, पी. एन. धुमाळ, एस्सार, बडगुजर तसेच पालिकेचे स्वच्छता अभियंता श्रीकांत फागणेकर, सुनील संसारे, स्वच्छता निरीक्षक समन्वयक निखिलेश जामनेकर, अजय दिघे यांचा या पथकात समावेश
होता.शहरातील सर्वच विक्र ेत्यांवर यापुढे कडक नजर ठेवून वेळोवेळी धाडी टाकण्याच्या सूचना प्रदूषण नियंत्रण मंडळाने पालिकेला दिल्या आहेत. प्लॅस्टिक आढळल्यास पहिल्यांदा पाच हजार, दुसºयावेळी पंधरा हजार व तिसºया वेळी पंचवीस हजारांचा दंड केला जाणार आहे. त्यानंतरही प्लॅस्टिकचा वापर आढळल्यास दुकानाला कायमचे सील करण्याच्या सक्त सूचना मुख्य अधिकारी संगीता नांदूरकर यांनी पथकाला दिल्या आहेत. नाशिकहून अचानक पथक आल्याने पालिका प्रशासन व येथील पथकाची चांगलीच धांदल उडाली.

Web Title: Four hundred kilo plastic bags seized in Yeola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.