अंजनेरी वनात चौघा शिकाऱ्यांना बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:15 AM2021-05-27T04:15:56+5:302021-05-27T04:15:56+5:30

नाशिक : पश्चिम वनविभागाच्या त्र्यंबकेश्वरजवळील अंजनेरी राखीव वनात अवैधरित्या घुसखोरी करत रानडुकरांची शिकार करणाऱ्या चौघा शिकाऱ्यांना वनविभागाच्या सतर्क गस्तीपथकाने ...

Four hunters were handcuffed in Anjaneri forest | अंजनेरी वनात चौघा शिकाऱ्यांना बेड्या

अंजनेरी वनात चौघा शिकाऱ्यांना बेड्या

Next

नाशिक : पश्चिम वनविभागाच्या त्र्यंबकेश्वरजवळील अंजनेरी राखीव वनात अवैधरित्या घुसखोरी करत रानडुकरांची शिकार करणाऱ्या चौघा शिकाऱ्यांना वनविभागाच्या सतर्क गस्तीपथकाने सापळा रचून अटक केली आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने संशयितांना शनिवारपर्यंत (२९) वन कोठडी सुनावली आहे.

समृद्ध जैवविविधतेचे माहेरघर असलेल्या अंजनेरी राखीव वनाकडे शिकाऱ्यांनी पुन्हा वक्रदृष्टी केली आहे. येथील रान ससे, रानडुकरांसारख्या वन्यप्राण्यांची शिकार करण्यासाठी शिकारी वाघरूसारखे जाळे लावत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

अंजनेरी नियतक्षेत्रातील तळवाडे भागात वाघरू लावून वन्यजीवांची शिकार करण्याचा प्रयत्न सुरू असताना वनविभागाच्या गस्ती पथकाने संशयित विठ्ठल मंगळु भुरभुडे (३४), रामा गणपत लोखे (४८), रामदार गोविंद सराईत (४५, सर्व रा. अंधारवाडी) आणि सोमो भिवा पारधी (४५ रा. काचुर्ली) या चौघांना पथकाने अटक केली. त्यांच्याकडून शिकारीच्या साहित्यासह गुन्ह्यासाठी वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. आली. वनक्षेत्रपाल विवेक भदाणे, वनपाल सुजित बोकडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

संशयितांविरुद्ध भारतीय वन अधिनियम १९२७ आणि वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. शनिवारपर्यंत संशयितांची चौकशी केली जाणार आहे.

----

फोटो nsk वर सेंड

जप्त केलेले शिकारीचे साहित्य

Web Title: Four hunters were handcuffed in Anjaneri forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.