राष्ट्रीय महामार्गावरील अपघात चार जण गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 10:42 PM2020-10-11T22:42:09+5:302020-10-12T01:16:02+5:30
नांदूरवैद्य : नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे दुमाला येथे झालेल्या अपघात चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (दि. 11) रोजी 3.30 वाजेच्या सुमारास घडली असून जखमींना गोंदे दुमाला येथील जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रु ग्णवाहिकेतून उपचारासाठी घोटी येथील खासगी रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे दुमाला येथे नाशिकहून मुंबईकडे भरधाव वेगाने जात असतांना मारूती कार क्र मांक (एम. एच. 02, बी.पी. 1636) या कारने समोरून चाललेल्या पादचा-यास जोरदार धडक दिल्याने या झालेल्या अपघातात काळू श्रावण भांगरे (45, रा. राजूर अकोले) कोंडिबा मुरलीधर चासकर (61) मनिषा कोंडिबा चासकर (53) चंद्रकला अण्णासाहेब चासकर (45, रा. सर्व ठाणे) हे चार जण गंभीर जखमी झाले आहेत. सदर अपघाताची माहिती मिळताच गोंदे फाटा येथील जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रु ग्णवाहिकेचे चालक निवृत्ती गुंड यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना रु ग्णवाहिकेतून उपचारासाठी घोटी येथील खासगी रु ग्णालयात दाखल करण्यात आले. रविवारीच झालेल्या तीन अपघातांना 24 तास होत नाही तोच पुन्हा एक अपघात घडला असल्याने ही अपघातांची मालिका अशीच सुरु राहणार की यावर काही प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येतील अशी चर्चा नागरिक करीत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुंढेगाव ते विल्होळी दरम्यान नेहमीच अपघात घडत असून व्हिटीसी फाटा येथे गतिरोधक बसविण्यात यावे अशी मागणी नागरिक करीत असून संबंधित प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांनी यावेळी सांगितले.
(11 नांदूरवैद्य 1)
गोंदे दुमाला येथील महामार्गावरील झालेल्या अपघातात मारूती कार रस्ता सोडून बाहेर गेल्याने कारची झालेली अवस्था.