पिंपळगावला अपघातात चौघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 11:03 PM2018-02-21T23:03:31+5:302018-02-22T00:16:33+5:30
मुंबई-आग्रा महामार्गावरील शिरवाडे फाट्याजवळ हॉटेल गोदावरीसमोर बुधवारी (दि.२१) दुपारी चार वाजता स्विफ्ट कार व ट्रॅक्टर यांच्यात समोरासमोर होऊन झालेल्या अपघातात ४ जण जखमी झाले.
पिंपळगाव बसवंत : मुंबई-आग्रा महामार्गावरील शिरवाडे फाट्याजवळ हॉटेल गोदावरीसमोर बुधवारी (दि.२१) दुपारी चार वाजता स्विफ्ट कार व ट्रॅक्टर यांच्यात समोरासमोर होऊन झालेल्या अपघातात ४ जण जखमी झाले. पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये कांदे विक्री करून चांदवडच्या दिशेने जात असलेले ट्रॅक्टर डिझेल भरण्यासाठी पंपाकडे वळण घेत असताना चांदवडहून पिंपळगावच्या दिशेने येणारी स्विफ्ट कार (क्रमांक एमएच१५ एएक्स २३५९) ट्रॅक्टरवर येऊन आदळली. यात कारमधील भास्कर उमाजी सोनवणे, सारिका चौधरी, मोतीराम रामराव चव्हाण, जयश्री मोतीराम चव्हाण (सर्व, रा. रेडगाव ता.निफाड) जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पिंपळगाव बसवंत येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर अपघाताची नोंद पिंपळगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
अपघात झाल्यानंतर शिरवाडे फाटे येथील स्वामी नरेंद्रचार्य महाराज यांच्या रु ग्णवाहिका व त्यांचे स्वयंसेवकांनी अपघातस्थळी धाव घेत मदतकार्य केले. सर्व जखमींना तातडीने पिंपळगाव येथील रुग्णालयात दाखल केल्याने जखमींवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले.
मुंबई-आग्रा महामार्गवर वावरणारे ट्रॅक्टर बेशिस्त चालत असल्याने महामार्गावरील धावणाºया वाहनांना धोका निर्माण होत आहे. ट्रॉलींना रेडियम नसल्याने रात्री लक्षात येत नाही. ट्रक्टरचा अधिकृत परवाना व क्रमांक नसेल तर अशा चालकांवर वेळीच कारवाई करण्याची गरज असल्याचे मत अपघात बघणाºया नागरिकांनी व्यक्त केले आहे.