सटाण्यात महिलेच्या मृत्यू प्रकरणी चौघांची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 11:36 PM2018-11-06T23:36:59+5:302018-11-06T23:37:14+5:30
सटाणा : शहरातील डॉ. किरण अहिरे यांच्या पत्नीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी मंगळवारी (दि. ६) मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक नीलोत्पल व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने डॉ. अहिरे यांच्यासह चार जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. सकाळी ११ वाजेपासून सुरू असलेली रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती.
सटाणा : शहरातील डॉ. किरण अहिरे यांच्या पत्नीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी मंगळवारी (दि. ६) मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक नीलोत्पल व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने डॉ. अहिरे यांच्यासह चार जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. सकाळी ११ वाजेपासून सुरू असलेली रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती.
शहरात अनेक वर्षांपासून रुग्ण सेवा देणारे डॉ. किरण अहिरे, पं.ध. पाटील नगरमध्ये वास्तव्यास आहेत. त्याच ठिकाणी त्यांचा दवाखानादेखील आहे. गेल्या दि. २ आॅक्टोबरला रात्रीच्या सुमारास त्यांच्या पत्नी सुषमा अहिरे दवाखान्याच्या आवारात रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळून आल्या होत्या. त्या गेल्या काही वर्षांपासून एका आजाराने ग्रासल्या होत्या, असे बोलले जात आहे. दरम्यान, सटाणा पोलिसांनी शवविच्छेदन करून आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली होती. दरम्यान मंगळवारी सकाळी अचानक डॉ. अहिरे यांच्या निवासस्थानी अपर अधीक्षक निलोत्पल यांच्यासह विशेष पथक, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक असा पोलिसांचा ताफा दाखल झाल्याने खळबळ उडाली. त्यात दोन महिलांचा समावेश आहे.पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ,मोबाईल कॉल सीडीआर अशा संशयास्पद वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. सकाळी ११ वाजता चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे. रात्री उशिरा पर्यंत चौकशी सुरूच होती.मात्र रात्री उशिरा पर्यंत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे या प्रकरणी काही आक्षेपार्ह बाबी निदर्शनास आल्याने मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांना नव्याने तपास करण्याचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे , जिल्हा पोलीस प्रमुख संजय दराडे यांनी दिले आहे. त्यानुसार निलोत्पल यांनी सकाळी एक तास व सायंकाळी एक तास घटना स्थळाची पाहणी केली. यामुळे या घटनेला वेगळे वळण मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.सुषमा अहिरे यांनी २ आॅक्टोबरला रात्री ११ वाजेच्या दरम्यान घराच्या दुसºया मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याचे घटनेच्या दिवसी पोलीस सूत्रांनी सांगितले. त्यानुसार पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी घटना स्थळाची एक तास पाहणी केली. त्या नंतर डॉ.किरण अहिरे यांच्यासह चार जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.