मुंबई महामार्गावर अपघातात ४ ठार ४० जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 07:44 PM2018-12-08T19:44:18+5:302018-12-08T19:44:47+5:30
शिर्डीहून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी लक्झरी बसच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने इगतपुरी तालुक्यातील पाडळी देशमुख जवळ अपघात झाला. या अपघातात ४ ठार तर ४० जण जखमी झाले आहेत.
घोटी : शिर्डीहून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी लक्झरी बसच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने इगतपुरी तालुक्यातील पाडळी देशमुख जवळ अपघात झाला. या अपघातात ४ ठार तर ४० जण जखमी झाले आहेत. जखमी आणि मृतांमध्ये दिल्ली, मुंबई येथील प्रवासी असल्याचे समजते. जखमींना नाशिकच्या जिल्हा शासकीय रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातामुळे नाशिककडे जाणारी वाहतूक तासभर विस्कळीत झाली.
याबाबत अधिक माहिती अशी की शिर्डी येथून साईबाबांचे दर्शन करून ५० प्रवासी क्षमतेची लक्झरी बस क्र मांक एमएच.०१सीव्ही.९६७५ नाशिकडून मुंबईकडे जात होती. मुंबई आग्रा महामार्गावर संध्याकाळी ५.४५ वाजता इगतपुरी तालुक्यातील पाडळी देशमुख शिवारात बसच्या वेगावर नियंत्रण मिळविण्यास बसचालकाला अपयश आल्याने ही बस दुभाजकावर कोसळली. यानंतर २०० फूट फरफटत ही बस रस्त्यावर आदळली. या गंभीर अपघातात बसमधील ४ जण ठार तर ४० जण जखमी झाले. अपघात झाल्याचे समजताच नरेंद्र महाराज संस्थानचे रु ग्णवाहक निवृत्ती गुंड, टोलनाका रु ग्णवाहिका सेवेने जखमींना मदत करून रु ग्णालयात दाखल केले. वाडीवºहे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेउन वाहतुक सुरळीत केली.